योग्य उमेदवार मिळेना; भारतात सायबर सिक्योरिटी क्षेत्रात 40,000 नोकऱ्या, लाखोंमध्ये पगार...

By ओमकार संकपाळ | Published: June 21, 2023 09:01 PM2023-06-21T21:01:27+5:302023-06-21T21:02:09+5:30

IT Jobs in India: डिजिटल इंडियाला गती मिळाल्यानंतर आता देशात सायबर सुरक्षाही महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. त्यामुळेच या क्षेत्रात नोकऱ्या वाढत आहेत.

IT Jobs in India: 40,000 jobs in cyber security sector in India, salary in lakhs | योग्य उमेदवार मिळेना; भारतात सायबर सिक्योरिटी क्षेत्रात 40,000 नोकऱ्या, लाखोंमध्ये पगार...

योग्य उमेदवार मिळेना; भारतात सायबर सिक्योरिटी क्षेत्रात 40,000 नोकऱ्या, लाखोंमध्ये पगार...

googlenewsNext

IT Jobs in India: डिजिटल इंडियाला गती मिळाल्यानंतर आता देशात सायबर सुरक्षाही महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. त्यामुळे या क्षेत्रात नव्या नोकऱ्याही मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहेत. मे 2023 पर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकली तर, देशात सायबर सिक्युरिटीमध्ये सुमारे 40,000 नोकऱ्या आहेत आणि या पदांसाठीचा पगारही प्रचंड आहे.

टीमलीज डिजिटलच्या अहवालानुसार, देशात सायबर सिक्युरिटी स्किल्सची मागणी झपाट्याने वाढत आहे. मात्र या या क्षेत्रात योग्य उमेदवार मिळणे अवघड झाले आहे. कुशल उमेदवार नसल्यामुळे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर जागा रिका्या आहेत. कामाच्या तुलनेत फक्त 30 टक्के कुशल उमेदवार आहेत. 

80 लाखांपर्यंत पॅकेज मिळवा
सायबर सिक्युरिटी प्रोफेशनल्सना मार्केटमध्ये उत्कृष्ट सॅलरी पॅकेजही मिळत आहे. टीमलीजच्याच अहवालात असे म्हटले आहे की, प्रेसिडेंट-इंफॉर्मेशन सिक्योरिटी किंवा चीफ इंफॉर्मेशन सिक्योरिटी ऑफिसर स्तरावरील लोकांना 50 लाख ते 80 लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज ऑफर केले जाते. तर, 12 वर्षांचा अनुभव असलेल्या लोकांना 30 लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज मिळू शकते. विशेष म्हणजे, या क्षेत्रात फ्रेशर्सना 6 ते 10 लाख रुपये पगार दिला जातो. 

आणखी वाढ अपेक्षित 
सायबर सुरक्षा क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. याचे कारण म्हणजे सतत वाढत जाणारे सायबर हल्ले. 2023 च्या पहिल्या तिमाहीत भारतीय संस्थांना दर आठवड्याला 2000 हून अधिक सायबर हल्ल्यांना सामोरे जावे लागले आहे, जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा 18 टक्के अधिक आहे. अशा स्थितीत सायबर सिक्युरिटी मार्केट आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. 2027 पर्यंत ही बाजारपेठ दरवर्षी 8.05 टक्के दराने $3.5 अब्ज पर्यंत वाढू शकते.

Web Title: IT Jobs in India: 40,000 jobs in cyber security sector in India, salary in lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.