Iphone Voices Calling Tablet | आयबॉलचा व्हॉईस कॉलिंग टॅबलेट
आयबॉलचा व्हॉईस कॉलिंग टॅबलेट

आयबॉल या भारतीय कंपनीने टॅबलेट उत्पादनावर आपले लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. किफायतशीर मूल्यात अतिशय उत्तमोत्तम फिचर्सने सज्ज असणारे मॉडेल्स लाँच केल्यामुळे टॅबलेट विक्रीच्या क्षेत्रात देशातील पहिल्या पाच कंपन्यांमध्ये समाविष्ट होण्याचा बहुमानही आयबॉलने मिळवला आहे. या अनुषंगाने बाजारपेठेतील आपली स्थिती भक्कम करण्यासाठी आयबॉल स्लाईड ब्रेस-एक्सजे हा टॅबलेट सादर करण्यात आला आहे. वर नमूद केल्यानुसार यात फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्क सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. याच्या मदतीने उत्तम दर्जाच्या कॉलींगसह वेगवान इंटरनेटचा आनंद घेता येणार आहे. तर उर्वरित कनेक्टिव्हिटीमध्ये वाय-फाय, ब्ल्यु-टुथ आदींचा समावेश आहे. यात ७,८०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून ती एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल १२ तासांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे.

आयबॉल स्लाईड ब्रेस-एक्सजे या मॉडेलमध्ये १०.१ इंच आकारमानाचा आणि एचडी क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. ऑक्टा-कोअर प्रोसेसरने सज्ज असणार्‍या या टॅबलेटची रॅम ३ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ६४ जीबीपर्यंत वाढविता येणार आहे. एलईडी फ्लॅशसह यातील मुख्य कॅमेरा ८ तर फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा असेल. यात असणार्‍या ड्युअल चेंबर या प्रकारातील स्पीकरमुळे युजरला उत्तम ध्वनीची अनुभूती घेता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. तर यात तब्बल २२ भारतीय भाषांचा सपोर्टदेखील प्रदान करण्यात आला आहे. तर हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे आहे. हा टॅबलेट ग्राहकांसाठी १९,९९९ रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आला आहे.

 


Web Title: Iphone Voices Calling Tablet
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.