Instagram स्टोरीसाठी गाणं वाजणार, नवे 'लिरिकल स्टीकर्स' येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 03:02 PM2019-05-14T15:02:09+5:302019-05-14T15:06:31+5:30

इन्स्टाग्राम आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असतं. इन्स्टामध्ये असलेलं स्टोरी फीचर अत्यंत लोकप्रिय आहे. यामध्ये सध्या एका नव्या फीचरची चाचणी करण्यात येत आहे.

instagram is testing lyrical sticker feature in stories popular songs will play with stickers | Instagram स्टोरीसाठी गाणं वाजणार, नवे 'लिरिकल स्टीकर्स' येणार

Instagram स्टोरीसाठी गाणं वाजणार, नवे 'लिरिकल स्टीकर्स' येणार

Next
ठळक मुद्देइन्स्टाग्राम आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असतं. इन्स्टामध्ये असलेलं स्टोरी फीचर अत्यंत लोकप्रिय आहे. इन्स्टाच्या स्टोरीमध्ये स्टीकर्स अ‍ॅड केल्यानंतर बॅकग्राऊंडला गाणं ऐकू येणार आहे. इन्स्टाग्रामच्या या नव्या फीचरमुळे इमेज शेअरींग प्लॅटफॉर्म स्नॅपचॅट आणि टिक-टॉक सारख्या लोकप्रिय अ‍ॅपला टक्कर देण्याचा प्रयत्न करत असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

नवी दिल्ली - सोशल मीडियात फोटोंच्या दुनियेतून वर्चस्व गाजवणाऱ्या इन्स्टाग्रामचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. इन्स्टाग्राम आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असतं. इन्स्टामध्ये असलेलं स्टोरी फीचर अत्यंत लोकप्रिय आहे. यामध्ये सध्या एका नव्या फीचरची चाचणी करण्यात येत आहे. इन्स्टाच्या स्टोरीमध्ये स्टीकर्स अ‍ॅड केल्यानंतर बॅकग्राऊंडला गाणं ऐकू येणार आहे. अ‍ॅपमध्ये लवकरच हे नवं फीचर येण्याची शक्यता आहे. 

रिवर्स इंजिनिअर जेन मांचुन वांग यांनी ट्वीटरवरून याबाबत माहिती दिली आहे. वांग यांना एका छोटा म्युझिक व्हिडिओदेखील ट्वीट केला आहे. यामध्ये रिक अ‍ॅश्लीचा 'Never Gonna Give You Up' हे गाणं ऐकू येत आहे. The Verge ने ही चाचणी स्पॉट केली आहे मात्र याबाबतची अधिक माहिती समोर आलेली नाही. गेल्या वर्षी इन्स्टाने स्टोरीज फीचरमध्ये म्युझिक अ‍ॅड करण्याचा एक पर्याय युजर्सना दिला होता. युजर्स इन्स्टा स्टोरीसह म्युझिक लावू शकत होते. तसेच काही क्लिप्स, फोटो आणि व्हिडिओ यांना स्टोरीसह डिझाईन करू शकत होते. त्यावेळी इन्स्टाग्रामने आणखी काही लोकप्रिय गाण्यांचा समावेश करणार असल्याचं म्हटलं होतं. 


इन्स्टाग्रामच्या या नव्या फीचरमुळे इमेज शेअरींग प्लॅटफॉर्म स्नॅपचॅट आणि टिक-टॉक सारख्या लोकप्रिय अ‍ॅपला टक्कर देण्याचा प्रयत्न करत असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. इन्स्टाग्राम एकाच अ‍ॅपमध्ये सगळे फीचर्स युजर्सला देण्याचा प्रयत्न करत आहे. इन्स्टाने नव्या म्युझिकल स्टीकर्सशिवाय स्टोरीज फीचरसाठी एक नवीन रेकॉर्ड केला आहे. इन्स्टाग्रामने दिलेल्य़ा माहितीनुसार, दररोज 50 कोटी युजर्स अ‍ॅपवर स्टोरीज पोस्ट करत असतात. 

Instagram वर कमी लाईक्स येतात? नवं फीचर करेल मदत

इन्स्टावर आपल्या पोस्टना अथवा फोटोला किती लाईक मिळतात हे युजर्सच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असतं. मात्र काही जणांच्या पोस्टला खूपच कमी लाईक्स मिळतात. अशा इन्स्टाग्राम युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे कारण इन्स्टाग्राम लाईक्स लपवण्यासाठी एका नव्या फीचरवर सध्या काम करत आहे. टेकक्रंचने दिलेल्या रिपोर्टनुसार, युजर्समध्ये अनेकदा लाईक्सवरून स्पर्धा सुरू असते. ही स्पर्धा कमी करण्यासाठी इन्स्टाग्रामने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. अनेकदा आपल्या प्रतिस्पर्धी युजर्सचे लाईक अधिक असल्यास त्याच्याबाबत द्वेष निर्माण होतो. तर काही जण कमी लाईक्स मिळतील म्हणून पोस्ट न करण्याचा विचार करतात. त्यामुळे या नव्या फीचरचा सर्व युजर्सना फायदा होणार आहे. युजर्स मनात कोणत्याही प्रकारचा संकोच न ठेवता यामुळे बिनधास्त पोस्ट करू शकतात. इन्स्टाग्रामच्या प्रवक्यांनी रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, इन्स्टाग्राम अशाप्रकारचं फीचर आणण्यासाठी विचार करत होतं. सध्या या फीचरची चाचणी सुरू आहे.

Instagram वर आता व्हिडीओ रिवाइंड करता येणार

इन्स्टाग्राम एक नवीन फीचर आणणार असून या फीचरच्या मदतीने व्हिडीओ आता रिवाइंड करणे शक्य होणार आहे. इन्स्टाग्राम apk फाइलमध्ये @wongmjane च्या डेवलपरने याबाबत माहिती दिली आहे. इन्स्टाग्राम व्हिडीओ सीक बारची चाचणी घेत आहे. तसेच एखाद्या व्हिडीओच्या सीक बारवर क्लिक करून कोणत्याही सेकंदावर घेऊन जाऊन तो व्हिडीओ पाहता येणार आहे. मात्र इन्स्टाग्रामच्या या नव्या फीचरचा फटका हा काही युजर्सना बसणार आहे. कारण आधी रिवाइंडचा पर्याय उपलब्ध नसल्याने युजर्स एका व्हिडीओवर बराच वेळ थांबून राहत होते. मात्र आता या फीचर नंतर ते इन्स्टा युजर्स फक्त आपल्याला हवा असलेला व्हिडीओचा भाग ड्रॅग करून पाहू शकतात. इन्स्टाग्रामचं व्हिडीओ रिवाइंडचे हे फीचर लवकरच येणार असल्याची माहिती मिळत आहे. 

instagram new feature soon users may hide likes on posts | Instagram वर कमी लाईक्स येतात? नवं फीचर करेल मदत

आता इन्स्टाग्रामवर सुद्धा करा शॉपिंग, नवीन फीचर लाँच! 

सोशल मीडियात लोकप्रिय असणारे इन्स्टग्राम आता ई-कॉमर्समध्ये उतरले आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी इन्स्टाग्रामवर निवडक ब्रँडच्या उत्पादनाची खरेदी करण्याची सुविधा आणली आहे. अमेरिकेत प्रायोगिक तत्वावर याची सुरुवात करण्यात आली आहे. इन्स्टाग्राम अ‍ॅपमध्ये नवीन फीचर आणले आहे. या फीचरच्या माध्यमातून ग्राहकांना खरेदीची सुविधा देण्यात आली आहे. इन्स्टाग्राम फेसबुकचीच एक कंपनी आहे. या कंपनीने एक ऑनलाइन पोस्ट केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, 'आम्ही इन्स्टाग्रामवर उत्पादने खरेदी करण्याची सुविधा देत आहेत. जर तुम्हाला काही उत्पादने आवडली असतील, तर इन्स्टाग्राम अ‍ॅपच्या माध्यमातून खरेदी करु शकता.' याचबरोबर, इन्स्टाग्राम अ‍ॅपमध्ये चेकआऊट बटनवर क्लिक केल्यानंतर उत्पादनांची संपूर्ण माहिती ग्राहकांना मिळणार आहे. यामधून ग्राहक आपल्या आवडीची उत्पादने खरेदी करु शकतात, असे कंपनीने म्हटले आहे. 

इन्स्टाग्रामने आणलं नवं फीचर, अश्लील फोटो ब्लर ठेवणार

इन्स्टाग्रामने आपल्या युजर्ससाठी एक नवीन फीचर आणले आहे. सेन्सिटिव्ह स्क्रीन असं या नव्या फीचरचं नाव असून इन्स्टाने हे फीचर लॉन्च केले आहे. या फीचरमुळे अश्लील फोटो, व्हिडीओ, थंबनेल्स युजर्सने क्लिक करेपर्यंत ब्लर दिसणार आहेत. वोग डॉट को डॉट यूकेच्या अहवालानुसार, भारतात इन्स्टाग्राम वापरणाऱ्या ग्राहकांसाठी हे फीचर आहे. अश्लील, वादग्रस्त कमेंट्सला आळा घालण्यासाठी इन्स्टाग्रामने हे पाऊल उचललं आहे. अल्पवयीन मुला-मुलींना नुकसान पोहचू नये यासाठी हे फीचर उपयोगी ठरणार आहे.

 

Web Title: instagram is testing lyrical sticker feature in stories popular songs will play with stickers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.