सावधान! गुगल ट्रॅक करतेय तुमचे खासगी लोकेशन, असे बंद करा 'लोकेशन ट्रॅकिंग'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 09:52 AM2018-08-16T09:52:22+5:302018-08-16T09:54:33+5:30

तुम्ही जर स्मार्टफोन वापरत असाल तर तुमचे लोकेशन ट्रॅक करण्यात येऊ शकते. त्यातच, अँड्रॉईड आणि आयओएस डिवाईसवाला स्मार्टफोनवर गुगलद्वारे सहज लोकेशन ट्रॅक करता येते. विशेष म्हणजे

How to turn off Google's location tracking | सावधान! गुगल ट्रॅक करतेय तुमचे खासगी लोकेशन, असे बंद करा 'लोकेशन ट्रॅकिंग'

सावधान! गुगल ट्रॅक करतेय तुमचे खासगी लोकेशन, असे बंद करा 'लोकेशन ट्रॅकिंग'

googlenewsNext

सेन फ्रान्सिस्को - तुम्ही जर स्मार्टफोन वापरत असाल तर तुमचे लोकेशन ट्रॅक करण्यात येऊ शकते. त्यातच, अँड्रॉईड आणि आयओएस डिवाईसवाला स्मार्टफोनवर गुगलद्वारे सहज लोकेशन ट्रॅक करता येते. विशेष म्हणजे या दोन्ही वर्जनमधील स्मार्टफोनमध्ये लोकेशन हिस्ट्री ऑफ केल्यानंतरही युजर्सचे लोकेशन गुगलमार्फत ट्रेस केले जाऊ शकते. एखाद्या संबंधित एजन्सी किंवा तपास यंत्रणांना गरज पडल्यास गुगलकडून ही माहिती पुरविण्यात येते. 

गुगलकडून ट्रेस करण्यात येणारी तुमचे लोकेशन हिस्ट्री बंद करण्याचा तुमच्याकडे पर्याय आहे. गुगल लोकेशन सेटींग्जमध्ये जाऊन तुम्ही 'गुगल लोकेशन हिस्ट्री' ऑफ करु शकता. तसेच गुगलच्या 'माय अॅक्टीव्हिटी पॅनलमध्ये जाऊन तुम्ही तुमचा रेकॉर्डेड लोकेशन डेटाही डिलीट करू शकता. 

तुम्ही तुमच्या मोबाईलचे लोकेशन चालू ठेवा अथवा नको, गुगल तुमच्यावर घारीसारखी नजर ठेऊन आहे. तुम्ही कुठे जाता, काय खाता, काय करता याचा संपूर्ण लेखाजोखा गुगल ठेवत असल्याचा धक्कादायक खुलासा एका न्यूज एजन्सीच्या अभ्यासात झाला आहे. तुमचे गुगल मॅम, सर्ज इंजिन आणि हवामान लोकेशन यावरुन गुगल तुमचे लोकेशन ट्रॅक करत असते. 

अँड्रॉईड युजर्संने खालील पद्धत वापरावी

* सर्वप्रथम सेटींग्जवर क्लिक करा.
त्यानंतर Google आणि Google Account
नंतर data & personalisation tab. त्यानंतर web & app Activity
Toggle Web & App Activity off

* आयफोन, आयपॅड आणि कॉम्युटरसाठी

सर्वप्रथम या link वर क्लीक करा, त्यामुळे तुम्ही थेट activity controls page (you may have to sign into your Google account to access the page) वर याल. त्यानंतर 
Toggle the web & app Activity setting off
The toggle for location history is directly below the web & app Activity setting, which you can also toggle off
 

Web Title: How to turn off Google's location tracking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.