अरे व्वा! गुगलचं मोठं अपडेट, स्विच ऑफ फोनचं मिळणार लोकेशन; आलं नवीन Find My Device

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 04:27 PM2024-04-09T16:27:10+5:302024-04-09T16:34:37+5:30

Google ने अपग्रेड Find My Device नेटवर्क रोलआऊट केलं आहे. हे नवीन कॅपिबिलिटीसह आलं आहे, ज्यामध्ये ऑफलाईन किंवा स्विच ऑफ केलेले फोन देखील सहजपणे शोधले जाऊ शकतात.

google launches new find my device for android found phone even they switch off | अरे व्वा! गुगलचं मोठं अपडेट, स्विच ऑफ फोनचं मिळणार लोकेशन; आलं नवीन Find My Device

अरे व्वा! गुगलचं मोठं अपडेट, स्विच ऑफ फोनचं मिळणार लोकेशन; आलं नवीन Find My Device

Google ने अपग्रेड Find My Device नेटवर्क रोलआऊट केलं आहे. हे नवीन कॅपिबिलिटीसह आलं आहे, ज्यामध्ये ऑफलाईन किंवा स्विच ऑफ केलेले फोन देखील सहजपणे शोधले जाऊ शकतात. सध्या हे फिचर अमेरिका आणि कॅनडामध्ये जारी करण्यात आलं असून लवकरच जगातील इतर देशांमध्येही ते सादर केलं जाणार आहे.

Find My Device हे Crowdsourced Network वर काम करतं. हे नेटवर्क हरवलेला किंवा चोरीला गेलेला स्मार्टफोन शोधण्यात मदत करेल. Google चं Find My Device हे अगदी Apple च्या Find My Network सारखं आहे. हे अपग्रेड केलेले Find My Device Android 9 किंवा त्यावरील व्हर्जनवर काम करेल.

ऑफलाइन काम करेल 

नवीन Find My Device नेटवर्क युजर्ससाठी खूप उपयुक्त ठरू शकतं. हे लेटेस्ट अपग्रेड मोबाईल आणि टॅबलेट ऑफलाइन असूनही ते शोधण्यात मदत करेल. या लेटेस्ट अपडेटनंतर, युजर्स ऑफलाइन मोबाईलची रिंग वाजवण्यास सक्षम असतील आणि Google Maps वर त्याचं लोकेशन देखील पाहू शकतील. टेकक्रंचच्या रिपोर्टमधून ही माहिती मिळाली आहे. आगामी काळात त्याचा सपोर्ट इतर प्रोडक्टसाठी देखील मिळेल.

आधी इंटरनेटची होती गरज

जुन्या Find My Device सर्व्हिससाठी इंटरनेट आवश्यक आहे. म्हणजेच मोबाईल किंवा टॅबलेट हरवला असेल आणि त्यात इंटरनेट कनेक्टिव्हिटी असेल तर ते डिव्हाइसचं लोकेशन शोधून रिंग करेल. इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्यास, हे फीचर काम करणार नाही.

स्विच ऑफ फोनचं मिळणार लोकेशन

अपग्रेडेड Find My Network हे नेटवर्क युजर्ससाठी अतिशय उपयुक्त ठरू शकतं. रिपोर्टनुसार, नवीन फाइंड माय डिव्हाइस मोबाईल स्विच ऑफ केल्यानंतरही त्याचं लोकेशन शोधण्यात मदत करेल. सध्या हे वैशिष्ट्य Pixel 8 आणि Pixel 8 Pro वर उपलब्ध असेल. तथापि, हे वैशिष्ट्य इतर ब्रँडच्या उपकरणांवर कधी पोहोचेल याबद्दल अद्याप कोणतीही ऑफिशियल टाइमलाइन सांगण्यात आलेली नाही.
 

Web Title: google launches new find my device for android found phone even they switch off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.