गार्मीनचा विवोस्पोर्ट स्मार्ट अ‍ॅक्टीव्हिटी ट्रॅकर

By शेखर पाटील | Published: December 28, 2017 09:29 AM2017-12-28T09:29:39+5:302017-12-28T09:30:14+5:30

गार्मीन कंपनीने भारतीय बाजारपेठेत आपला विवोस्पोर्ट हा स्मार्ट अ‍ॅक्टीव्हिटी ट्रॅकर १५,९९० रूपये मूल्यात लाँच करण्याची घोषणा केली आहे.

 Garmin's Vivosport Smart Activity Tracker | गार्मीनचा विवोस्पोर्ट स्मार्ट अ‍ॅक्टीव्हिटी ट्रॅकर

गार्मीनचा विवोस्पोर्ट स्मार्ट अ‍ॅक्टीव्हिटी ट्रॅकर

Next

विवोस्पोर्ट स्मार्ट अ‍ॅक्टीव्हिटी ट्रॅकर हे मॉडेल ग्राहकांना फ्लिपकार्ट या शॉपिंग पोर्टलसह क्रोमा, रिलायन्स डिजीटल, गार्मीन किऑस्कसह देशातील निवडक शॉपीजमधून उपलब्ध करण्यात आले आहे. खरं तर, स्मार्टवॉच आणि अ‍ॅक्टीव्हिटी ट्रॅकर यांच्यातील फरक आता अस्पष्ट होऊ लागला आहे. अर्थात बहुतांश स्मार्टवॉचमध्येच अ‍ॅक्टीव्हीटींचे अचूक मापन करण्याची सुविधा असते. मात्र असे असतांनाही मार्गीनने विवोस्पोर्ट हे मॉडेल सादर केले आहे. याचे मूल्यदेखील तसे जास्त आहे. मात्र याच तोलामोलाचे यात फिचर्स असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यातील सर्वात लक्षणीय फिचर म्हणजे इनबिल्ट जीपीएस होय. याच्या मदतीने युजरच्या सर्व हालचालींचे मापन करण्यात येते. यात चाललेले अंतर, संबंधीत मार्ग, कापलेले अंतर आदींचा समावेश आहे. याला विविध सेन्सर्सची जोड देण्यात आलेली आहे. यामुळे चाललेल्या अंतरातून वापरण्यात आलेल्या कॅलरीजचे अचूक मापन करता येते. तसेच यात हार्ट रेट मॉनिटर, व्हिओ२मॅक्स आणि फिटनेस एज आदी विशेष फिचर्सदेखील आहेत. यातील व्हिओ२मॅक्स तंत्रज्ञानामुळे वर्कआऊट करतांना संबंधीत युजरच्या शरीरातील रक्ताभिसरणाची अचूक माहिती मिळते. यातील बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे ७ तासांपर्यंत चालत असल्याचा कंपनीचा दावा आहे.

ववोस्पोर्ट स्मार्ट अ‍ॅक्टीव्हिटी ट्रॅकरच्या माध्यमातून करण्यात आलेल्या व्यायामाची सर्वांगीण माहिती वेबसाईटसह अ‍ॅपच्या माध्यमातून एकाच ठिकाणी पाहता येते. हा ट्रॅकर अँड्रॉइड व आयओएस अ‍ॅपच्या मदतीने स्मार्टफोनला अटॅच करता येते. यात या ट्रॅकरच्या विविध फंक्शनच्या कार्यान्वयनासह सोशल मिडयाचे नोटिफिकेशन्स, कॉल्स, एसएमएस, ई-मेल्स, म्युझिक कंट्रोल आदींची सुविधा देण्यात आली आहे.

Web Title:  Garmin's Vivosport Smart Activity Tracker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.