फेसबुकवर लवकरच येणार डेटिंग सर्व्हिस, जाणून घ्या नव्या फीचरबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2018 03:18 PM2018-05-02T15:18:21+5:302018-05-02T15:18:21+5:30

फेसबुक लवकरच युजर्ससाठी डेटिंग सर्व्हिस सुरू करण्याच्या विचारात आहे.

Facebook Will Soon Offer a Dating Service | फेसबुकवर लवकरच येणार डेटिंग सर्व्हिस, जाणून घ्या नव्या फीचरबद्दल

फेसबुकवर लवकरच येणार डेटिंग सर्व्हिस, जाणून घ्या नव्या फीचरबद्दल

Next

नवी दिल्ली- फेसबुक लवकरच युजर्ससाठी डेटिंग सर्व्हिस सुरू करण्याच्या विचारात आहे. मंगळवारी फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकर्सबर्ग यांनी याबद्दलची माहिती दिली. लोकांना डेटिंग सर्व्हिसद्वारे ऑनलाइन जोडण्यासाठी याचा उपयोग होईल, असं फेसबुकच्या वार्षीक एफ 8 परिषदेमध्ये  मार्क झुकर्सबर्ग यांनी सॉफ्टवेअर डेव्हलपर्सना सांगितलं. 

सध्या 20 करोड लोकांनी स्वतःला सिंगलच्या यादीत टाकलं आहे. त्यामुळे नक्कीच अशा प्रकारच्या सर्व्हिसचा फायदा होऊ शकतो. दिर्घ काळासाठी रिलेशन शोधू पाहणाऱ्यांसाठी ही सर्व्हिस असेल. डेटिंग सर्व्हिस ऑप्शनल असून लवकरच लॉन्च केली जाईल. डेटिंग सर्व्हिस तयार करताना प्रायव्हसीकडे पूर्णपणे लक्ष दिलं जाणार आहे. फेसबुकमध्ये तुमच्या यादीत असणारी प्रत्येक व्यक्ती तुमचं डेटिंग प्रोफाइल पाहू शकत नाही, असं झुकर्सबर्ग यांनी सांगितलं.

फेसबुकवर गेल्या काही दिवसांपासून युजर्सचा डेटा लीक केल्यामुळे टीका होते आहे. या प्रकरणावरून मार्क झुकर्सबग यांनी डेटा लीकची जबाबदारी स्वीकारत युजर्सची माफी मागितली होती. 

Web Title: Facebook Will Soon Offer a Dating Service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.