'Dell' कंपनीच्या ६,६०० कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार, कंपनीनं धाडलं फर्मान!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 03:03 PM2023-02-06T15:03:35+5:302023-02-06T15:05:25+5:30

यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच अनेक दिग्गज टेक कंपन्या मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करून हजारो कर्मचाऱ्यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवत आहेत.

dell layoff news 6600 employees might loose jobs says report | 'Dell' कंपनीच्या ६,६०० कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार, कंपनीनं धाडलं फर्मान!

'Dell' कंपनीच्या ६,६०० कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार, कंपनीनं धाडलं फर्मान!

googlenewsNext

यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच अनेक दिग्गज टेक कंपन्या मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करून हजारो कर्मचाऱ्यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवत आहेत. आता Dell Technologies Inc. कंपनीचंही नाव यात सामील झालं आहे. अमेरिकेतील डेल कंपनीच्या कार्यालयात काम करणार्‍या कर्मचार्‍यांवर टांगती तलवार आहे. डेल कंपनी जागतिक कर्मचार्‍यांपैकी ५ टक्के कमी करण्याचा विचार करत असल्याचे अनेक मीडिया रिपोर्ट्स समोर येत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, Dell Technologies Inc कंपनीची एकूण ६६५० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची योजना आहे. जे कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या ५ टक्के इतकी कर्मचारी कपात असणार आहे. ब्लूमबर्गने पाहिलेल्या मेमोमध्ये, डेलचे सह-चीफ ऑपरेटिंग ऑफिसर जेफ क्लार्क म्हणाले की कंपनी बाजारातील तणावपूर्वक परिस्थितीचा सामना करत आहे. ज्यामुळे बाजार परिस्थितीवर परिणाम होत आहे. म्हणजेच कंपनीच्या कर्मचारी कपातीचं कारण बाजाराच्या परिस्थितीवर अवलंबून आहे.

जेफ क्लार्क म्हणाले की, नवीन कर्मचारी भरती थांबवणे आणि कर्मचाऱ्यांच्या प्रवास खर्चावर मर्यादा आणणे यासारखे खर्च कपातीबाबत घेतलेले निर्णय आता पुरेसे नाहीत. 

HP ने नोव्हेंबर २०२२ मध्ये केली होती कर्मचारी कपात
गेल्या वर्षी नोव्हेंबर २०२२ मध्ये, संगणक आणि लॅपटॉप निर्माता HP ने घोषणा केली होती की कंपनी पुढील तीन वर्षांत सुमारे ६,००० कर्मचाऱ्यांना काढून टाकेल. HP ने देखील कॉम्प्युटरच्या मागणीत झालेली घट पाहून मोठ्या प्रमाणावर लोकांना कामावरून काढून टाकण्याचा मोठा निर्णय घेतला होता.

Web Title: dell layoff news 6600 employees might loose jobs says report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :dellडेल