फक्त 13 हजारांच्या आत नवीन प्रीमियम Smart TV लाँच; 32 इंचाच्या डिस्प्लेसह डॉल्बी ऑडियो सपोर्ट 

By सिद्धेश जाधव | Published: January 27, 2022 07:01 PM2022-01-27T19:01:34+5:302022-01-27T19:04:11+5:30

Budget Smart TV: टीव्ही निर्माता कंपनी Vu नं भारतात आपला नवीन 32 इंचाचा Vu Premium TV सादर केला आहे.  

Budget Smart TV With 32 Inch Display Launched At Rs 13000 With Dolby Audio By Vu   | फक्त 13 हजारांच्या आत नवीन प्रीमियम Smart TV लाँच; 32 इंचाच्या डिस्प्लेसह डॉल्बी ऑडियो सपोर्ट 

फक्त 13 हजारांच्या आत नवीन प्रीमियम Smart TV लाँच; 32 इंचाच्या डिस्प्लेसह डॉल्बी ऑडियो सपोर्ट 

Next

Vu भारतात आपल्या Vu Premium TV रेंजमध्ये 32 इंचाच्या Smart TV चा समावेश केला आहे. हा स्मार्ट टीव्ही सध्या प्री-ऑर्डरसाठी भारतात उपलब्ध झाला आहे. याची विक्री ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वरून केली जाईल. हा टीव्ही बेजल-लेस डिजाइन, 64 बिट क्वॉडकोर प्रोसेसर आणि डॉल्बी ऑडिओसह सादर करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया याचे स्पेक्स आणि फीचर्स.  

Vu Premium TV 32-inch ची किंमत आणि ऑफर्स 

Vu Premium TV 32-inch ची किंमत 12,999 रुपये आहे. हा टीव्ही सध्या Flipkart वरून प्री-ऑर्डर करता येईल. याची विक्री 1 फेब्रुवारीपासून सुरु करण्यात येईल. हा टीव्ही अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डनं विकत घेतल्यास 1250 रुपयांपर्यंतची सूट मिळेल. तर सिटी बँक कार्ड धारक 10 टक्क्यांची बचत करू शकतात. 

Vu Premium TV 32-inch चे स्पेक्स  

या नव्या Vu Tv मध्ये 32 इंचाचा एचडी रेडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक ए प्लस ग्रेड पॅनल आहे जो 1366 x 768 पिक्सल रिजोल्यूशन आणि 300 निट्स पीक ब्राईटनेसला सपोर्ट करतो. यात अँड्रॉइडच्या ऐवजी लिनक्स स्मार्ट ओएस देण्यात आला आहे. तरीही यात युट्युब, नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राईम, इरोज नाऊ आणि इतर अनेक ओटीटी अ‍ॅप्स मिळतात देतो.  

या स्मार्ट टीव्हीमध्ये 20W आउटपुट देणारा स्पीकर देण्यात आला आहे, जो डॉल्बी ऑडियो आणि डीटीएस ट्र सराऊंडला सपोर्ट करतो. हा टीव्ही 64 बिट क्वॉड-कोर प्रोसेसर वर चालतो. सोबत 1 जीबी रॅम आणि 4 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 2 यूएसबी पोर्ट्स, वाय-फाय 802.11बी/जी/एन, एवी पोर्ट, 2 एचडीएमआय पोर्ट्स आणि ऑप्टिकल ऑडियो आउटपुट  असे ऑप्शन देण्यात आले आहेत.  

हे देखील वाचा:

Web Title: Budget Smart TV With 32 Inch Display Launched At Rs 13000 With Dolby Audio By Vu  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.