बीएसएनएलची 'लूट लो' ऑफर, या प्लॅन्सवर 500 टक्के जास्त डेटा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2017 06:16 PM2017-11-01T18:16:38+5:302017-11-01T18:19:31+5:30

सरकारी टेलीकॉम कंपनी BSNL ने एक नवी 'लूट लो' ऑफर आणली आहे. यामध्ये ग्राहकांना 60 टक्के डिस्काउंट मिळेल तर 500 टक्के जास्त इंटरनेट डेटा मिळणार आहे.

BSNL's 'loot' offer, 500 percent more data on these plans | बीएसएनएलची 'लूट लो' ऑफर, या प्लॅन्सवर 500 टक्के जास्त डेटा

बीएसएनएलची 'लूट लो' ऑफर, या प्लॅन्सवर 500 टक्के जास्त डेटा

मुंबई - सरकारी टेलीकॉम कंपनी BSNL ने एक नवी 'लूट लो' ऑफर आणली आहे. यामध्ये पोस्टपेड ग्राहकांना 60 टक्के डिस्काउंट मिळेल तर 500 टक्के जास्त इंटरनेट डेटा मिळणार आहे. या प्लॅनमध्ये सात रिचार्ज उपलब्ध असून आजपासून ही ऑफर मिळवता येणार आहे.   
बीएसएनएलची नवीन लूट लो ऑफर सात रिचार्ज प्लॅन  225 रुपये, 325 रुपये , 525 रुपये, 725 रुपये, 799 रुपये, 1125 रुपये आणि 1525 रुपयांवर उपलब्ध असणार आहे. 99 रूपये आणि 146 रूपयांचा प्लॅन वापरणा-या ग्राहकांना कंपनीकडून 500MB डेटाची ऑफर आहे. 
ही ऑफर देशभरात लागू असणार असून केवळ 3G नेटवर्कवरच ही ऑफर असणार आहे कारण बीएसएनएल अजून  4G नेटवर्क ऑपरेट करत नाही. 
 कोणत्या प्लॅनमध्ये किती डेटा - 
 
--  225 रुपये प्लॅन: 3GB डेटा

--  325 रुपये प्लॅन: 7GB डेटा

--  525 रुपये प्लॅन:  15GB डेटा

--  725 रुपये प्लॅन:  30GB डेटा

--  1125 रुपये प्लॅन: 60GB डेटा

--  1525 रुपये प्लॅन:  90GB डेटा
यापूर्वी सप्टेंबर महिन्यात बीएसएनएलने  प्री-पेड ग्राहकांसाठी 249 रूपये आणि 429 रूपयांचा प्लॅन आणला होता. या प्रमोशनल ऑफर्स होत्याय या ऑफरमध्ये 249 रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 28 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह 1 जीबी डेटा दरदिवशी दिला जात होता. तसेच BSNL टू BSNL अनलिमिटेड कॉलची ऑफरही होती. 
 

Web Title: BSNL's 'loot' offer, 500 percent more data on these plans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.