सावधान...! तुमची बँक अकाऊंट हॅक होताहेत...असे वाचवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 08:51 AM2018-12-24T08:51:51+5:302018-12-24T12:53:21+5:30

इंटरनेटच्या जमान्यात नवीन पिढी आजकाल बँकिंग सुविधा मोबाईल, काँम्प्युटरवर वापरत आहे.

Beware ...! Save as your bank account from hack...! | सावधान...! तुमची बँक अकाऊंट हॅक होताहेत...असे वाचवा!

सावधान...! तुमची बँक अकाऊंट हॅक होताहेत...असे वाचवा!

googlenewsNext

मुंबई : इंटरनेटच्या जमान्यात नवीन पिढी आजकाल बँकिंग सुविधा मोबाईल, काँम्प्युटरवर वापरत आहे. युपीआय सेवा देणारे सरकारी भीम अॅप तसेच अन्य खासगी अॅपमुळे पैसे वळविणे एकदम सोपे झाले आहे. तसेच बँकाही त्यांचे अॅप आणि इंटरनेट, मोबाईल बँकिंग सेवा देत आहेत. यामुळे तुमच्या कष्टाची जमापुंजीवर डोळा असलेले हॅकरही सरसावले आहेत. त्यांच्यापासून वाचण्यासाठी सतत जागरूक राहणे गरजेचे आहे. नाहीतर बँकेतील पैसे गायब होण्याची शक्यता आहे. 


हॅकिंगमध्ये सर्वाधिक प्रसिद्ध असलेला प्रकार म्हणजे फिशिंग. तुमच्या बँकेची किंवा एखाद्या शॉपिंग साईटसारखी हुबेहूब वेबसाईट किंवा पेज तयार करायचे; त्याच्यावर आकर्षक ऑफर्स द्यायच्या आणि तुमचा लॉगीन आयडी पासवर्ड, बँक एटीएमचे डिटेल्स मिळवायचे हा एक प्रचलित प्रकार आहे. इमेलमध्ये किंवा व्हॉट्सअॅपवर या पानाची लिंक पाठवायची  आणि त्यावर क्लिक करायला लावायचे. या फिशिंगमुळे अनेकांना गंडा घातला गेला आहे. हा प्रकार सोशल मिडियाचे डिटेल्स मिळविण्यासाठीही केला जातो. यामुळे अशा लिंकपासून सावध राहावे. 


या लिंकवर गेल्यावर एक पॉपअप मॅसेज दाखविला जातो. त्याद्वारे मालवेअर तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरमध्ये टाकला जातो. यानंतर त्या हॅकरला तुमच्या कॉम्प्युटरचा अॅक्सेस मिळतो. 


दुसरा प्रकार म्हणजे, तुम्ही टाईप करत असलेल्या की बोर्ड वरील बटनांची नोंद ठेवणे. सायबर कॅफे किंवा तुम्हाला गरज असेल तर दुऱ्याचा लॅपटॉप वापरताना अत्यंत सावध राहावे. कारण तुम्ही टाईप करत असलेल्या प्रत्येक बटनाची नोंद एखाद्या सॉफ्टवे्रद्वारे ठेवता येते. यामुळे लॉगिन आयडी, पासवर्ड सहज हॅकरला मिळू शकतो. यामुळे दुसऱ्या ठिकाणी कॉम्प्युटर वापरताना सावध राहायला हवे.


तिसरा प्रकार म्हणजे, हॅकर तुमच्या मोबाईलवर एसएमएस पाठिवतो. यामध्ये तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड बंद होणार असल्याचे म्हटलेले असते. हा मॅसेज बँकेचा असल्याचेही भासवले जाते. कधीकधी आयकर अधिकारी असल्याचेही सांगितले जाते. या दोन्ही प्रकारात मोबाईलवर पाठविलेला ओटीपी मागितला जातो. हा ओटीपी दिल्यास तुमच्या खात्यातून पैसे काढले जातात. असा ओटीपी कोणालाही देऊ नये. 
 

Web Title: Beware ...! Save as your bank account from hack...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.