Smart Phone Hacks: गरम होणाऱ्या फोनला थंड करण्यासाठी करा हे सोपे उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2018 04:36 PM2018-06-01T16:36:55+5:302018-06-01T16:49:38+5:30

मात्र थोड्याशा वापरानेही तो जास्त हीट होत असेल तर त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ही समस्या काही सोप्या उपायांनीही घालवू शकता. 

Android phone battery heating problems and solution | Smart Phone Hacks: गरम होणाऱ्या फोनला थंड करण्यासाठी करा हे सोपे उपाय!

Smart Phone Hacks: गरम होणाऱ्या फोनला थंड करण्यासाठी करा हे सोपे उपाय!

googlenewsNext

(Image Credit: mobilityarena.com)

मुंबई : स्मार्टफोन वापरणाऱ्यांना अनेकदा फोम हीट होत असल्याची समस्या भेडसावत असते. अनेकांना फोन फुटण्याचीही भीती वाटते. पण अनेकांना फोन हीट का होतो याची माहितीच नसते. हल्ली बऱ्याचदा गेम खेळताना, ब्राऊजिंगदरम्यान, चार्जिंग करताना मोबाईल गरम होतो. मोबाईल थोड्या प्रमाणात गरम होत असेल तर ठीक आहे. मात्र थोड्याशा वापरानेही तो जास्त हीट होत असेल तर त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ही समस्या काही सोप्या उपायांनीही घालवू शकता. 

कोणत्या कारणाने फोनमध्ये हीट निर्माण होते?

जेव्हाही ओव्हरहीटींगची समस्या येते, तेव्हा त्यात प्रोसेसरचा सर्वात मोठा हात असतो. त्यासोबत स्नॅपड्रॅगन ८१० आणि ६१५ हीटिंगसाठी कारणीभूत मानले जातात. पण ओव्हरहीटींगच्या मागे हेच एक कारण नाहीये. जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त स्मार्टफोनचा वापर करत असाल, जसे की, मल्टीटास्किंग, हाय-एन्ड गेम्स इत्यादी. तर तुमचा स्मार्टफोन वार्म होणार हे नक्की.

तसेच Li-ion बॅटरीमध्ये हीटींगची समस्या ‘थर्मल रनअवे’ या गोष्टीमुळेही होते. यामुळे फोन हीटींग अधिक जास्त धोकादायक होतं. जर स्मार्टफोन मेटल बॉडीचा असेल तर अधिक हीट निर्माण होते. फोम वार्म होण्याचं आणखी एक कारण म्हणजे फोनमध्ये नेटवर्क बरोबर नसेल किंवा सिग्नल वीक असेल, अशात जर तुम्ही अ‍ॅप्स डाऊनलोड केले तर फोन ओव्हरहीट होतो. 

काय कराल उपाय?

1) व्हिडीओ स्ट्रीमिंग आणि व्हिडीओ प्लेदरम्यान फोम हीट होतो का? खरंतर ही एक सामान्य बाब आहे. पण जास्तच हीट होत असेल तर तुम्ही एकदा कमी रेज असलेला व्हिडीओ प्ले करुन बघा. कारण हायडेफिनेशनचे व्हिडीओ प्ले करण्याची क्षमता तुमच्या फोनमध्ये नसावी. 

2) फोनची इंटरनल मेमरी फुल झाल्यानेही कधी कधी ही समस्या होते. अशावेळी नको असलेल्या फाईल इंटरनल मेमरीमधून डिलीट करा. 

3) गेम खेळताना मोबाईल फोन गरम होत असेल तर ओव्हरलोड होतोय असे समजा. त्यामुळे नको असेलले अॅप्लिकेशन सेटिंगमध्ये जाऊन बंद करा

4) नुसता ठेवल्यावरही फोन गरम होत असले तर त्याचे कारण ओव्हरलोड असू शकते. तुम्ही बॅटरीला ऑप्टिमाईज करु शकता. हा ऑप्शन सेटिंगमध्ये उपलब्ध आहे.

5) ब्राऊजिंगदरम्यान जर फोन गरम होत असेल तर ब्राऊजरच्या सेटिंगमध्ये जाऊन कंप्रेस डाटा अॅक्टिवेट करा. यामुळे केवळ तुमचा डेटाच कमी खर्च होणार नाही तर फोन गरम होणेही कमी होईल. 

6) कॉलिंगदरम्यान तुमचा फोन गरम होत असेल तर एकदा फोनची फॅक्ट्री डाटा रिसेट करा. सेटिंगमध्ये जाऊन बॅकअप अँड रिसेट या ऑप्शनमध्ये फॅक्ट्री डाटा रिसेट करता येईल. 

7) फोनच्या इंटरनल मेमरीमुळे कधी कधी फोन अधिक गरम होतो. त्यामुळे नको असलेल्या फाईल डिलीट करुन मेमरी कमी करा.  

8) जर तुमचा फोन चार्जिंगला लावलेला असताना गरम होत असेल तर दुसरा चार्जर वापरुन पाहा. तसेच ज्या पॉवर सर्किटमध्ये तुम्ही चार्जर लावताय तोही बदला. अनेकदा बॅटरी जुनी झाल्यानेही फोन गरम होण्याची समस्या होऊ शकते

9) फोन जुना झाल्यास आणि कोणत्याही फीचरचा वापर करताना तो गरम होत असेल तर एकदा सॉफ्टवेअर अपडेटवर नजर मारा. अनेकदा सॉफ्टवेअर अपडेट न केल्याने फोन गरम होऊ शकतो. 

Web Title: Android phone battery heating problems and solution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.