अँड्रॉइडवर प्रणालीवर चालणारे लेनोव्हो टॅबच्या ४ मालिका भारतात उपलब्ध

By शेखर पाटील | Published: September 22, 2017 06:16 PM2017-09-22T18:16:43+5:302017-09-22T18:23:59+5:30

लेनोव्हो कंपनीने किफायतशीर दरातली टॅब ४ ही मालिका भारतीय ग्राहकांना सादर करण्याची घोषणा केली आहे. टॅब ४ या मालिकेत चार टॅबलेट असून ते सर्व अँड्रॉइड या प्रणालीवर चालणारे आहेत

Android has 4 series of Lenovo tabs available on Android in India | अँड्रॉइडवर प्रणालीवर चालणारे लेनोव्हो टॅबच्या ४ मालिका भारतात उपलब्ध

अँड्रॉइडवर प्रणालीवर चालणारे लेनोव्हो टॅबच्या ४ मालिका भारतात उपलब्ध

Next
ठळक मुद्देलेनोव्हो टॅब ४ (८) - ८ इंच आकारमानाचा आणि एचडी म्हणजेच १२८० बाय ८०० पिक्सल्स क्षमतेचा आयपीएस डिस्प्लेलेनोव्हो टॅब ४ (८) प्लस - रॅम चार जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविता येईललेनोव्हो टॅब ४ (१०) - बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल २० तास चालत असल्याचा कंपनीचा दावालेनोव्हो टॅब ४ (१०) प्लस - गुगल असिस्टंटसह डॉल्बी अ‍ॅटमॉस ही अतिशय दर्जेदार ध्वनी प्रणाली

लेनोव्हो कंपनीने किफायतशीर दरातली टॅब ४ ही मालिका भारतीय ग्राहकांना सादर करण्याची घोषणा केली आहे. टॅब ४ या मालिकेत चार टॅबलेट असून ते सर्व अँड्रॉइड या प्रणालीवर चालणारे आहेत. या मॉडेल्सचे नाव लेनोव्हो टॅब ४ (८), टॅब ४ (८) प्लस, टॅब ४ (१०) आणि टॅब ४ (१०) प्लस असून त्यांचे मूल्य अनुक्रमे १२,९९०; १६,९९०; २४,९९० आणि २९,९९० रूपये असेल. हे सर्व टॅबलेट भारतीय ग्राहकांना फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येतील. 

लेनोव्हो टॅब ४ (८)

या टॅबलेटमध्ये ८ इंच आकारमानाचा आणि एचडी म्हणजेच १२८० बाय ८०० पिक्सल्स क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ४२५ प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. याची रॅम दोन जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविता येईल. यातील मुख्य कॅमेरा ५ तर फ्रंट कॅमेरा २ मेगापिक्सल्सचा असेल. तर यातील बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल २० तास चालत असल्याचा कंपनीचा दावा आहे. या टॅबलेटमध्ये ब्ल्यू-टुथ आणि वाय-फायसह फोर-जी नेटवर्क कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. हा टॅब स्लेट ब्लॅक आणि पोलर व्हाईट या रंगांच्या पर्यायांमध्ये ग्राहकांना उपलब्ध करण्यात आला आहे. या मॉडेलची खासियत म्हणजे यात गुगल असिस्टंट हा इनबिल्ट अवस्थेत देण्यात आला आहे. तसेच यात डॉल्बी अ‍ॅटमॉस ही अतिशय दर्जेदार ध्वनी प्रणाली असेल.

लेनोव्हो टॅब ४ (८) प्लस

या टॅबलेटमध्ये आधीपेक्षा काही उत्तम दर्जाच्या फिचर्सचा समावेश असेल. यातील ८ इंच आकारमानाचा डिस्प्ले हा फुल एचडी एचडी म्हणजेच १२०० बाय १९२० पिक्सल्स क्षमतेचा असेल.  याची रॅम चार जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविता येईल. यातील मुख्य कॅमेरा ८ तर फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा असेल. तर यातील बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल ३६ तासांचा बॅकअप देणारी असेल. या टॅबलेटमध्ये ब्ल्यू-टुथ आणि वाय-फायसह फोर-जी नेटवर्क कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. हा टॅब अरोरा ब्लॅक आणि स्पार्कलींग व्हाईट या रंगांच्या पर्यायांमध्ये ग्राहकांना उपलब्ध करण्यात आला आहे. यातही गुगल असिस्टंट हा इनबिल्ट अवस्थेत देण्यात आला आहे. तसेच यात डॉल्बी अ‍ॅटमॉस ही अतिशय दर्जेदार ध्वनी प्रणाली असेल.

लेनोव्हो टॅब ४ (१०)

लेनोव्हो टॅब ४ (१०) या टॅबलेटमध्ये १०.१ इंच आकारमानाचा आणि एचडी (१२८० बाय ८०० पिक्सल्स) क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ४२५ प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. याची रॅम दोन जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविता येईल. यातील मुख्य कॅमेरा ५ तर फ्रंट कॅमेरा २ मेगापिक्सल्सचा असेल. तर यातील बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल २० तास चालत असल्याचा कंपनीचा दावा आहे. या टॅबलेटमध्ये ब्ल्यू-टुथ आणि वाय-फायसह फोर-जी नेटवर्क कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. हा टॅब स्लेट ब्लॅक आणि पोलर व्हाईट या रंगांच्या पर्यायांमध्ये ग्राहकांना उपलब्ध करण्यात आला आहे. या मॉडेलमध्येही गुगल असिस्टंट हा इनबिल्ट अवस्थेत देण्यात आला आहे. तसेच यात डॉल्बी अ‍ॅटमॉस ही अतिशय दर्जेदार ध्वनी प्रणाली देण्यात आली आहे.

लेनोव्हो टॅब ४ (१०) प्लस

लेनोव्हो टॅब ४ (१०) प्लस या मॉडेलमध्ये १०.१ इंच आकारमानाचा डिस्प्ले हा फुल एचडी एचडी म्हणजेच १२०० बाय १९२० पिक्सल्स क्षमतेचा असेल. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ६२५ प्रोसेसर असेल. याची रॅम चार जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविता येईल. यातील मुख्य कॅमेरा ८ तर फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा असेल. तर यातील बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल २० तासांचा बॅकअप देणारी असेल. या टॅबलेटमध्ये ब्ल्यू-टुथ आणि वाय-फायसह फोर-जी नेटवर्क कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. हा टॅब अरोरा ब्लॅक आणि स्पार्कलींग व्हाईट या रंगांच्या पर्यायांमध्ये ग्राहकांना उपलब्ध करण्यात आला आहे. यातही गुगल असिस्टंट हा इनबिल्ट अवस्थेत देण्यात आला आहे. तसेच यात डॉल्बी अ‍ॅटमॉस ही अतिशय दर्जेदार ध्वनी प्रणाली असेल.

Web Title: Android has 4 series of Lenovo tabs available on Android in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.