एसर स्वीफ्ट ५ लॅपटॉप : जाणून घ्या सर्व फिचर्स

By शेखर पाटील | Published: March 15, 2018 01:44 PM2018-03-15T13:44:53+5:302018-03-15T13:44:53+5:30

एसर कंपनीने अत्यंत गतीमान अशा प्रोसेसरने सज्ज असणारा स्वीफ्ट ५ हा लॅपटॉप भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्याची घोषणा केली आहे.

Acer Swift 5 Laptop: Learn all the features | एसर स्वीफ्ट ५ लॅपटॉप : जाणून घ्या सर्व फिचर्स

एसर स्वीफ्ट ५ लॅपटॉप : जाणून घ्या सर्व फिचर्स

Next

भारतीय बाजारपेठेत उच्च श्रेणीतील लॅपटॉपही मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत. या पार्श्‍वभूमिवर एसर कंपनीने एसर स्वीफ्ट ५ हे याच प्रकारातील मॉडेल ग्राहकांना सादर केले आहे. याचे मूल्य ७९,९९९ रूपये असून ग्राहकांना हे विविध शॉपीजमधून खरेदी करता येणार आहे. एसर स्वीफ्ट ५ या मॉडेलमध्ये अनेक उत्तमोत्तम फिचर्स आहेत. मात्र यातील लक्षणीय बाब म्हणजे हा लॅपटॉप फक्त ९१४ ग्रॅम वजनाचा असून याची जाडी फक्त १४.९ मिलीमीटर इतकी आहे. यात मजबूत अशी अ‍ॅल्युमिनीयम बॉडी देण्यात आली आहे.  याशिवाय यात इंटेलचा आठव्या पिढीतील अत्यंत गतीमान असा कोअर आय-७ प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ८ जीबी असून इनबिल्ट स्टोअरेज ५१२ जीबी इतके असेल.

एसर स्वीफ्ट ५ या मॉडेलमध्ये डॉल्बी ऑडिओ प्रिमीयमसह ट्रु हार्मनी या तंत्रज्ञानांचा वापर करण्यात आला आहे. यामुळे यात अतिशय दर्जेदार ध्वनीची अनुभूती घेता येणार आहे. तर यातील बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर आठ तासांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. यात स्काईप फॉर बिझनेस ही प्रिमीयम सेवा प्रिलोडेड मिळणार आहे. परिणामी याच्या मदतीने सुलभपणे व्हिडीओ कॉन्फरन्सींग करता येणार आहे. हा लॅपटॉप विंडोज १० प्रणालीवर चालणारा आहे. यात विंडोज हॅलोच्या सपोर्टसह फिंगरप्रिंट स्कॅनरची सुविधादेखील असेल. या मॉडेलमध्ये १४ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी (१९२० बाय १०८० पिक्सल्स) क्षमतेचा डिस्प्ले असून यात कमी आकाराच्या कडा आहेत. यामध्ये कलर इंटिलेजियंट टेक्नॉलॉजीचा उपयोग करण्यात आला असून याच्या मदतीने स्क्रीन कलर व ब्राईटनेसला सुलभपणे अ‍ॅजडस्ट करता येत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. एसर स्वीफ्ट ५ या लॅपटॉपमध्ये युएसबी ३.१ टाईप-सी पोर्ट देण्यात आले आहेत. अन्य फिचर्समध्ये ब्ल्यु-टुथ, वाय-फाय आदींचा समावेश असेल.
 

Web Title: Acer Swift 5 Laptop: Learn all the features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.