Redmi Note 12 5G केवळ ९०० रुपयांत खरेदी करता येणार, 'या' युझर्सना मिळणार संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2023 12:54 PM2023-04-08T12:54:10+5:302023-04-08T12:57:15+5:30

तुम्ही अतिशय कमी किमतीत Redmi Note 12 5G खरेदी करू शकता.

A chance to buy Redmi Note 12 5G smartphone for just Rs 900 these users will get a chance xiaomi fan festival amazon | Redmi Note 12 5G केवळ ९०० रुपयांत खरेदी करता येणार, 'या' युझर्सना मिळणार संधी

Redmi Note 12 5G केवळ ९०० रुपयांत खरेदी करता येणार, 'या' युझर्सना मिळणार संधी

googlenewsNext

आज Xiaomi फॅन फेस्टिव्हलचा तिसरा दिवस आहे. आजही अनेक फोन कमी किमतीत खरेदी करता येणार आहे. हा सेल केवळ कंपनीच्या वेबसाइटवरच नाही तर Amazon वर देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. येथून तुम्ही अतिशय कमी किमतीत Redmi Note 12 5G खरेदी करू शकता. सर्व ऑफरनंतर हा स्मार्टफोन तुम्हाला केवळ 900 रुपयांना खरेदी करता येऊ शकतो. जर तुम्हाला हा फोन इतक्या कमी किमतीत घ्यायचा असेल तर आम्ही तुम्हाला या ऑफरचा लाभ कसा घेता येईल ते सांगत आहोत.

या फोनचे 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंट 19,999 रुपयांऐवजी 17,999 रुपयांना खरेदी करता येईल. यासोबतच अनेक ऑफर्सही दिल्या जात आहेत. आपण आता Amazon वर उपलब्ध असलेल्या ऑफर्सची माहिती घेऊ.

बँक ऑफर्स आणि ईएमआय
हा फोन खरेदी करण्यासाठी ICICI बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास 1,000 रुपयांपर्यंतची इन्स्टंट सूट दिली जाईल. त्याच वेळी, HSBC कॅशबॅक कार्डने पेमेंट केल्यास 5 टक्क्यांपर्यंत इन्स्टंट सूट मिळेल. EMI सह फोन खरेदी केल्यास, तुम्हाला दरमहा 860 रुपये द्यावे लागतील. यासोबतच नो कॉस्ट ईएमआयचा पर्यायही उपलब्ध आहे.

एक्सचेंज ऑफर्स
जर तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करणार असाल तर तुम्हाला 17,099 रुपयांपर्यंतची सूट दिली जाईल. पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाल्यावर, तुम्हाला फोन फक्त 900 रुपयांमध्ये मिळेल.

काय आहेत फीचर्स?
या स्मार्टफोनमध्ये सुपर AMOLED (1080x2400) डिस्प्ले देण्यात आला असून त्याचा रिफ्रेश रेट 120 Hz आहे. याशिवाय यात Snapdragon 4 Gen1 6nm प्रोसेसर देण्यात आलाय. फोनमध्ये 48-मेगापिक्सलचा AI ट्रिपल रिअर कॅमेरा आहे. दुसरा 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि तिसरा 2-मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर आहे. तर फोनमध्ये 13-मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर आहे. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये 5000mAh क्षमतेची मोठी बॅटरी देण्यात आली असून ती 33W फास्ट चार्जर सपोर्टसह येते.

Web Title: A chance to buy Redmi Note 12 5G smartphone for just Rs 900 these users will get a chance xiaomi fan festival amazon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.