राज यांचा कार्यकर्त्यांशी संवाद

By admin | Published: February 16, 2015 04:34 AM2015-02-16T04:34:32+5:302015-02-16T04:34:32+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी पक्षनेते राज ठाकरे हे स्वत: संवाद साधणार आहे. प्रत्येकाची मन की बात जाणून घेत थेट

Raj interact with activists | राज यांचा कार्यकर्त्यांशी संवाद

राज यांचा कार्यकर्त्यांशी संवाद

Next

पिंपरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी पक्षनेते राज ठाकरे हे स्वत: संवाद साधणार आहे. प्रत्येकाची मन की बात जाणून घेत थेट वन टू वन चर्चा करणार आहेत. हा संवाद उद्या, सोमवारी चिंचवड-थेरगाव रस्ता येथील एका हॉटेलमध्ये सकाळी दहा ते दुपारी साडेचारपर्यंत चालणार आहे.
ठाकरे हे नेहमी पुणे शहर येतात. मात्र, शेजारच्या पिंपरी-चिंचवड शहरात ते येण्याचे टाळतात. त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू होती. या संदर्भात त्याचा दौरा अचानक रद्द झाला होता. त्यामुळे पक्षाचे कार्यकर्तेच ठाकरे नक्की येणार आहेत का असे विचारत होते. त्यांची चुकलेली ती भेट सोमवारी निश्चित झाली आहे. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यकर्ते आणि पदाधिकारी ठाकरे यांना भेटणार आहेत. त्यात प्रत्येक प्रभागप्रमाणे गट केले आहेत. सकाळी दहाला त्यांचे आगमन होणार आहे. दुपारी साडेचारपर्यंत ते कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Raj interact with activists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.