I Don't Care
By admin | Published: May 20, 2016 11:04 AM2016-05-20T11:04:36+5:302016-05-20T11:04:36+5:30
कान्सच्या रेडकार्पेटवरून चालून आलेली जांभळ्या ओठांची गोष्ट
Next
>कान्सच्या रेडकार्पेटवर उतरलेल्या सौंदर्यवती ऐश्वर्याचे ‘पर्पल’ म्हणजेच जांभळे ओठ पाहून दुनिया चक्रावलीच.
ओठ? आणि जांभळे?
बहुसंख्यांना झेपलाच नाही हा प्रकार!
ऐश्वर्याचं हे ब्यूटी डिझास्टर आहे असं म्हणण्यापासून पार ‘पर्पल’ जोक्स व्हायरल करेपर्यंत ट्रोल करणा:या तरुण गॅँगनं सोशल मीडियात ऐश्वर्याची पार टर उडवली!
पण ऐश्वर्यानं जे ‘ब्यूटी स्टेटमेण्ट’ केलं ते सध्या सुरू असलेल्या ‘बोल्ड’ मेकअपचंच एक जागतिक प्रतिनिधित्व आहे आणि सध्या दुनियाभर तरुण मुली स्वत:ला अधिकाधिक ‘बोल्ड’ म्हणवून घेत आहेत, हे सांगितलं तर विश्वास ठेवाल तुम्ही?
- पण ते खरं आहे!!
दुनियेचे सुंदर दिसण्याचे ट्रेण्ड्स, व्याख्या, निकष आणि संदर्भ गेले उडत, मला जे रंग आवडतात तेच मी अंगाखांद्यावर मिरवीन, आय डोण्ट केअर, असं सांगणारा हा एक नवाच मेकअप ट्रेण्ड आहे.
आणि म्हणूनच ऐन समरमध्ये (म्हणजे उन्हाळ्यात!) कान्सच्या रेडकार्पेटवर अनेकजणी पिवळ्या रंगाचे कपडे घालून चालल्या.
आणि पिवळा कसा?
तर निऑन यलो, लेमन यलो, पपया यलो!
ज्या सिझनचा जो रंग, ते रंग आणि त्यातही अतिब्राईट रंग सहजी कुणी वापरत नाही. उन्हाळ्यात तर लाल, पिवळा, नारंगी रंग वापरणं म्हणजे फॅशन सेन्स हुकल्याचंच लक्षण!
यंदा मात्र बातच काही और!
कारण फॅशनच्या जगात या समरचा रंगच ‘यलो’ आहे. म्हणजे या उन्हाळ्यात पिवळ्या रंगाचे कपडे घालून मिरवणं हे जुन्या संकेतांना तोडणं आहे.
आणि त्या पिवळ्याला सोबत म्हणून जांभळा, वांगी, ऑरेंज हे सगळे रंग मिरवणं हे त्यापुढचं पाऊल आहे!
आणि म्हणून ज्यांचा फॅशनच्या दुनियेशी संबंधही नाही त्या मुलीही आपल्या डोळ्यात काजळ म्हणून, डोळ्यांवर आयशॅडो म्हणून, नखांवर नेलपेण्ट म्हणून आणि आता ओठांवरही हे रंग मिरवीत आहेत.
या बोल्ड कलरचीच एक खास झलक.