पैशाची डेट?

 • First Published :15-May-2017 : 10:25:33

 • - अजित जोशी

   

  आपण आपले पैसे दुसऱ्याच्या हातात देतो, कारण त्यातून आपल्याला भरपूर नफा हवा असतो. पण त्याच वेळेला आपली फसवणूक तर होणार नाही ना, हा धोकाही असतोच. तेव्हा पैसे गुंतवतानाच आपल्याला माहीत हवं की आपल्या पैशावर कोणता धोका पत्करला जातोय ते?

   

  मी गेले होते गं त्या एजंटाकडे. पण काय ते बाबा ओपन आणि क्लोज एण्डेड आणि तुमचा तो डिव्हिडंड का ग्रोथ मॉडेल आणि असं काय काय बोलायला लागला तो.. मला तर अजिबातच कळलं नाही. एफडीच बरी बाबा आपली!’ - सीताआत्या दडपूनच गेलेल्या होत्या.
  ‘अगं थांब गं तू आत्या जरा...!’ - सविता हसत हसत म्हणाली. ‘सगळं समजेल. आपल्याला आपल्याच पैशाच्या गोष्टीनं घाबरायला का होतं ते समजत नाही. मोठ्या मोठ्या इंग्रजी गोष्टी बोलल्या का उगीच घाबरून जायला होतं. एवढं काही कठीण नाहीये त्यात!’
  ‘अगं तसं नाही, तो एजंट गेल्या गेल्या म्हणे, डेट हवा का इक्विटी? आता उत्तर देण्याआधी त्याचा प्रश्न तर मला समजायला हवा ना!’ 
  ‘हं. मी सांगते सगळं तुला. मी म्हटलं नव्हतं का गेल्या वेळेला आधी थोडं समजून घ्या आणि मग लागा कामाला. आता मला सांग, आठवतंय का मी सांगितलं होतं की अनेक लोकं आपला कमीअधिक पैसा एखाद्या मोठी कंपनीनं सुरू केलेल्या गंगाजळीत ओततात ते?’
  ‘हो मग, आणि तो फंड मॅनेजर ते पैसे आपल्यासाठी गुंतवतो.’
  ‘बरोब्बर! पण आपल्याकडून गोळा करताना त्याला सांगावं लागतं की हा पैसा साधारणपणे कुठे गुंतवला जाणार ते. या असतात वेगवेगळ्या फंड योजना. मग कोणत्याही योजनेनिमित्त गोळा केलेला पैसा हा आधी सांगितल्यानुसारच गुंतवावा लागतो.’
  ‘आधीच ठरवायचं कुठे गुंतवणार ते?’
  ‘अगं म्हणजे असं की कोणत्या प्रकारची गुंतवणूक फंड मॅनेजर करणार आहे. उदा. कंपनीच्या हिश्श्यात अर्थात शेअर्समध्ये गुंतवणार की कंपनीला कर्ज देणार आपल्या पैशातून? यालाच म्हणतात इक्विटी किंवा डेट.’
  ‘अस्सं? म्हणजे ते म्हणत होता तो एजंट.’
  ‘हो. पण एवढंच नाही, अजून बरेच प्रकार आहेत कुठे गुंतवायचे ते ठरवताना. म्हणजे असं बघ, एखाद्या विशिष्ट क्षेत्रात गुंतवायचे असतील जसं का बांधकाम किंवा माहिती तंत्रज्ञान तर त्याच्या योजना वेगवेगळ्या असतात.’
  ‘पण हे एवढे प्रकार कशासाठी?’
  ‘अगं असं आहे आत्या, शेवटी आपण आपले पैसे दुसऱ्याच्या हातात देतो कारण त्यातून भरपूर नफा व्हावा असं आपल्याला वाटतं. पण त्याच वेळेला ज्याला दिलेला आहे तो त्या पैशाचा नीट वापर करू शकणार नाही किंवा आपल्याला फसवेल हा धोकाही आहेच ना त्यात? तेव्हा आपल्याला माहीत हवं की सर्वसाधारणपणे आपल्या पैशावर कोणता धोका पत्करला जातोय ते? कोणत्या क्षेत्रात तो गुंतवला जातोय? आणि त्यानुसारच आपण पैसे गुंतवले पाहिजेत.’
  ‘पण मला असं एका विशिष्ट क्षेत्रातच गुंतवायचे नसतील पैसे तर?’
  ‘हो, म्हणूनच मग तशाही योजना उपलब्ध आहेत. त्यात पुन्हा मग प्रकार आहेत. जसं समज मोठ्या आकाराच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवावे का मध्यम किंवा छोट्या? त्यावरूनही वेगवेगळ्या योजना असतात. आता तर अगदी पिटुकल्या आकाराच्या कंपन्यात गुंतवायच्या पण योजना आहेत. ए०४्र३८ ऋ४ल्ल२ि प्रकारातली योजना. या म्हणजे सगळ्याची एक भट्टी. यात आधी कोणताही ठरावीक वायदा न करता, सगळ्या प्रकारच्या हिश्श्यात पैसे गुंतवले जातात. भारतात, भारताबाहेर, त्यात पुन्हा वेगवेगळ्या खंडात गुंतवणूक करण्याची संधीही आपल्याला म्युच्यअल फंड देत असतो.’
  ‘हं... म्हणजे कंपनीत पैसे गुंतवायचा हा आडमार्ग आहे तर.’ ‘फक्त कंपनीत कशाला? काही योजना असतात ज्यातले पैसे हे फक्त वेगवेगळ्या धातूत किंवा इतर उपयुक्त वस्तूंत गुंतवले जातात. म्हणजे लोखंड, स्टील किंवा सोनं.’
  ‘सोन्यात?’ - सीताकाकू लगेच सावरून बसल्या.
  ‘हो नं. आणि ते जास्त फायद्याचं आहे. असं आहे आत्या, सोन्याच्या किमती कायम वाढत असतात. दोन वर्षांपूर्वी ज्या बांगड्या पंचवीस हजाराला घेतल्या असशील तर आज त्या विकून तीस हजार मिळतील.’ 
  ‘छे, भलतंच काय बोलणं तुझं! बांगड्या विकण्याएवढी परिस्थिती वाईट नाही माझी’ - फणकाऱ्यानं आत्याबाई म्हणाल्या. 
  ‘हो गं’ - हसत हसत सविता म्हणाली. 
  ‘चिडू नको एवढं, पण याच गोष्टीमुळे आपण सोन्यात फारसं गुंतवत नाही. हेच जर तू सोनं विकत घेणाऱ्या म्युच्युअल फंडात पैसे गुंतवलेस तर थेट खरेदी-विक्र ी न करता फायदा मिळेल.’
  ‘बाप रे. हा सगळा विषय समजायला म्हणजे अजून एक वेगळा अभ्यास पाहिजे!’
  ‘फार गहन नाही गं हा अभ्यास. पण हे बघ, मी तुला गेल्या खेपेला सांगितलं ना की या योजनेत जिथे पैसे गुंतवले असतील त्याच्या किमतीवरून योजनेचं मूल्य बदलायला लागतं.’
  ‘हो, आठवतंय नं मला. खवचटपणे माझ्या म्हातारीच्या सिरिअल्सची नावं काढली होतीस बरोब्बर.’ 
  ‘बरोबर. आता त्यावरून तुझ्या हिश्श्याचा हिशेब ठरतो. त्या प्रत्येक हिश्श्याच्या किमतीला म्हणतात ठअश् म्हणजे नेट अ‍ॅसेट व्हॅल्यू. आता असं आहे की या ठअश् च्या पूर्वीच्या किमती जरी पाहिल्या तरी लगेच अंदाज येतो कुठे चांगला फायदा होतोय ते. आणि तुला गंमत सांगते, फंडाचे सगळे प्रकार अजून संपलेच नाहीयेत. उद्या येईन ना परत दुपारची तेव्हा उरलेले प्रकार आणि हा ठअश् कसा उपयोगी आहे ते सांगते तुला!’

  (लेखक चार्टर्ड अकाउंटण्ट असून, मॅनेजमेंट कॉलेजमध्ये अध्यापक आहेत.meeajit@gmail.com )महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS