नोकरीच्या आमिषाने फसवणूक

By admin | Published: November 1, 2015 12:27 AM2015-11-01T00:27:02+5:302015-11-01T00:27:02+5:30

नाशिक : नोकरीच्या आमिषाने एका युवकाची हजारो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे़ याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ याबाबत अधिक माहिती अशी की, तारवालानगर येथील रणजित रमेश बोधक (२६) यास संशयित दगडू चौधरी (रा. जळगाव) याने मुंबईतील जे़ जे़ रुग्णालयात वॉर्डबॉयची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून २५ हजार रुपये घेतले़ मात्र पैसे घेतल्यानंतर चौधरीने नोकरीविषयी तसेच पैसे परत देण्याविषयी टाळाटाळ केली़ यामुळे रणजित यास फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला़ (प्रतिनिधी)

Cheating by job bait | नोकरीच्या आमिषाने फसवणूक

नोकरीच्या आमिषाने फसवणूक

Next
शिक : नोकरीच्या आमिषाने एका युवकाची हजारो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे़ याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ याबाबत अधिक माहिती अशी की, तारवालानगर येथील रणजित रमेश बोधक (२६) यास संशयित दगडू चौधरी (रा. जळगाव) याने मुंबईतील जे़ जे़ रुग्णालयात वॉर्डबॉयची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून २५ हजार रुपये घेतले़ मात्र पैसे घेतल्यानंतर चौधरीने नोकरीविषयी तसेच पैसे परत देण्याविषयी टाळाटाळ केली़ यामुळे रणजित यास फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला़ (प्रतिनिधी)

Web Title: Cheating by job bait

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.