शेतक-यांचे दीड लाखापर्यंतचे कर्ज सरसकट माफ, 89 लाख शेतक-यांना फायदा

By Admin | Published: June 24, 2017 03:16 PM2017-06-24T15:16:26+5:302017-06-24T16:54:42+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दुपारी पत्रकार परिषदेत शेतक-यांना कर्जमाफी देण्याच्या निर्णयाची घोषणा केली.

Grant of debt to farmers up to 1.5 lakh, welfare of 89 lakh farmers | शेतक-यांचे दीड लाखापर्यंतचे कर्ज सरसकट माफ, 89 लाख शेतक-यांना फायदा

शेतक-यांचे दीड लाखापर्यंतचे कर्ज सरसकट माफ, 89 लाख शेतक-यांना फायदा

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 24-  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दुपारी पत्रकार परिषदेत शेतक-यांना कर्जमाफी देण्याच्या निर्णयाची घोषणा केली. शेतक-यांना 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. दीड लाखापर्यंतचे कर्ज सरसकट माफ केले असून, त्यामुळे 90 टक्के शेतक-यांचा सातबारा कोरा होणार आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे 
- शेतक-यांना 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी 
- दीडलाखापर्यंतच कर्ज सरसकट माफ
- 90 टक्के शेतक-यांचा सातबारा कोरा होणार आहे 
- 40 लाख शेतक-यांचा सातबारा कोरा होणार.
- नियमित कर्ज भरणाऱ्यांना 25 हजारांपर्यंत अनुदान मिळणार.
- राज्य आणि केंद्र सरकारच्या कर्मचा-यांना कर्जमाफीमधून वगळल. 
- 30 जून 2016 पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ  मिळेल.
- लोकप्रतिनिधी, आमदारांना कर्जमाफीच्या निर्णयातून वगळल. 
- हा अभूतपूर्व निर्णय असून, यापेक्षा कर्जमाफीचा बोजा उचण्याची क्षमता नाही. 
 
2012 पासून पडणा-या दुष्काळामुळे शेतकरी कर्जात बुडाला होता. शेतक-यांना कर्जमाफी देण्याची मागणी सुरु होती. आम्ही सभागृहात कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. कर्जमाफी संदर्भात आमची विविध घटकांशी चर्चा सुरु होती. कर्जमाफीसाठी सरकार सकारात्मक असल्याचे आम्ही आंदोलकांना सांगितले होते असे मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 
 
कर्जमाफीसाठी मंत्रिगटाची उच्च समिती तयार करुन शेतक-यांच्या सुकाणू समितीशीही चर्चा केली. सुकाणू समितीबरोबर काही मुद्यांवर एकमत झाले काही मुद्यांवर एकमत होऊ शकले नाही. मी स्वत: शेतकरी नेते राजू शेट्टींबरोबर चर्चा केली. शरद पवारांबरोबर बोललो. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेतला असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 
 
कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दुपारी मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलवली. त्याचवेळी कर्जमाफीच्या निर्णयाची आज घोषणा होणार अशी चर्चा सुरु झाली होती. आज सकाळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. या भेटीत शेतकरी कर्जमाफीची मर्यादा 1 लाखावरून 2 लाख करा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. महसूलमंत्री चंद्राकांत पाटील शेतकरी कर्जमाफी संदर्भात राज्यातील इतर पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली. काल रात्री त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेतली. 
 
मंगळवारच्या कॅबिनेट बैठकीत कर्जमाफीची नोट काढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.दुसरीकडे शेतकरी कर्जमाफीसाठी निकष ठरवण्यासंदर्भात  गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत बैठक झाली. जवळपास तासभर झालेल्या बैठकीत शेतकरी कर्जमाफी संदर्भातील निकषांवर चर्चा झाली. 
 

 

Web Title: Grant of debt to farmers up to 1.5 lakh, welfare of 89 lakh farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.