तुम्ही आज लावा, येत्या निवडणुकीत कर्मचारीच तुमच्यावर "मेस्मा" लावतील; आडम यांची राज्य सरकारवर टीका

By Appasaheb.patil | Published: March 15, 2023 04:23 PM2023-03-15T16:23:28+5:302023-03-15T16:25:26+5:30

राज्य शासनाने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंगळवारी अत्यावश्यक सेवा म्हणजेच "मेस्मा" कायदा मंजूर करून घेतला आहे.

You apply today, in the coming elections the workers will apply MESMA on you says Adam criticism of the state government | तुम्ही आज लावा, येत्या निवडणुकीत कर्मचारीच तुमच्यावर "मेस्मा" लावतील; आडम यांची राज्य सरकारवर टीका

तुम्ही आज लावा, येत्या निवडणुकीत कर्मचारीच तुमच्यावर "मेस्मा" लावतील; आडम यांची राज्य सरकारवर टीका

googlenewsNext

सोलापूर : राज्य शासनाने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंगळवारी अत्यावश्यक सेवा म्हणजेच "मेस्मा" कायदा मंजूर करून घेतला आहे. याला सत्ताधारीच काय? विरोधी एकाही पक्षाने यास विरोधच काय? चर्चा ही न करता मंजूर केला, ही लोकशाहीची थट्टा आहे. त्यामुळे तुम्ही आता "मेस्मा" लावा. येत्या निवडणुकीत कर्मचारी व शिक्षक तुम्हाला "मेस्मा" लावतील, असा इशारा माजी आमदार नरसय्या आडम यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाना दिला आहे.

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी १४ मार्चपासून बेमुदत संपावर गेले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संपाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी त्यांना मार्गदर्शन करताना आमदार आडम बोलत होते. आडम यांनी एक लाख रुपयाचा लढा निधीही या संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी जाहीर केला. ते म्हणाले, "आता राज्य शासनाच्या तिजोरीवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. २०३५ पासून थोडा-थोडा आर्थिक भार पडणार असताना समिती स्थापन करण्याचे नाटक कशासाठी करता. त्यासाठी तुम्ही जुनी पेन्शन योजना जाहीर करून राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना दिलासा द्या अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

Web Title: You apply today, in the coming elections the workers will apply MESMA on you says Adam criticism of the state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.