गावाकडच्या महिलांची विमानाने सफर; दिल्लीकरांनी चाखली सोलापुरच्या चविष्ट झुणका-भाकरीची चव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 05:29 PM2019-02-04T17:29:45+5:302019-02-04T17:36:32+5:30

भीमानगर :  ग्रामीण भागातील चवच न्यारी असते. हीच अनेक देशी-परदेशी लोकांना आपलीशी करते, आपल्या गावाकडची चव दिल्लीकरांना देण्यासाठी १५ ...

Women in the villages travel by plane; Dillakars tweeted the tasting of the tamarind juice of Bhiwani | गावाकडच्या महिलांची विमानाने सफर; दिल्लीकरांनी चाखली सोलापुरच्या चविष्ट झुणका-भाकरीची चव 

गावाकडच्या महिलांची विमानाने सफर; दिल्लीकरांनी चाखली सोलापुरच्या चविष्ट झुणका-भाकरीची चव 

Next
ठळक मुद्देसोलापूर व पुणे जिल्ह्यातील महिलांना राष्ट्रीय बाजारपेठेत संधीवूमन्स फाउंडेशनचा उपक्रम : दिल्ली प्रदर्शनात स्टॉलची संधी  महाराष्ट्रातली इरकल नऊवार साडी-चोळी, सोलापूर चादर व हलव्याचे (तीळगूळचे) दागिनेदेखील प्रदर्शनात

भीमानगर :  ग्रामीण भागातील चवच न्यारी असते. हीच अनेक देशी-परदेशी लोकांना आपलीशी करते, आपल्या गावाकडची चव दिल्लीकरांना देण्यासाठी १५ महिलांना सावली फाऊंडेशन व वसुंधरा फाउंडेशनच्या माध्यमातून थेट विमानाने दिल्ली सफर करता आली व आपल्या गावाकडचा ब्रँड दिल्लीकरांना देता आला.

 वसुंधरा वूमन्स फाउंडेशन, पुणे व सावली फाउंडेशन सोलापूर यांच्या विद्यमाने पुणे व सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांना थेट दिल्ली येथील जागतिक बाजारपेठेत झुणका-भाकर स्टॉल लावण्याची संधी प्रदर्शनात मिळाली. यामुळे दिल्लीकरांना झुणका-भाकर व पुरणपोळीची चव चाखता आली.

एन. एस. आय. सी. व सी.एस.सी.सी. च्या वतीने दिल्ली येथे अनुसूचित जाती-जमातीमधील महिला बचत गटांच्या उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन नुकतेच दिल्ली येथील कॉन्स्टीट्युशन क्लब येथे पार पडले. यात सावली फाउंडेशन सोलापूर व वसुंधरा वूमन्स फाउंडेशन पुणे यातील महिला बचत गटांनी सहभाग नोंदवला. सावली फाउंडेशन व वसुंधरा वूमन्स फाउंडेशनने अशा जागतिक दर्जाच्या बाजारपेठेत संस्थेच्या महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या, वस्तूंचे दोन स्टॉल लावण्याची संधी ग्रामीण भागातील महिलांना उपलब्ध करून दिली. 

महाराष्ट्रातली इरकल नऊवार साडी-चोळी, सोलापूर चादर व हलव्याचे (तीळगूळचे) दागिनेदेखील प्रदर्शनात ठेवण्यात आले होते. या सोलापुरी वस्तुंसोबतच अस्सल महाराष्टÑाची ओळख पटविणाºया या वस्तूंच्या आणि खाद्यपदार्थांच्या खरेदीसाठी दिल्लीकरांची झुंबड उडाली होती. विशेषत: यात महिलांचा सहभाग अधिक प्रमाणावर होता. फाउंडेशनच्या १५ महिलांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदविला. माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे व वसुंधरा वूमन्स फाउंडेशनच्या संस्थापिका कोमल साळुंखे-ढोबळे यांच्या  सहकार्याने या महिलांना ही संधी मिळाली. 

Web Title: Women in the villages travel by plane; Dillakars tweeted the tasting of the tamarind juice of Bhiwani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.