निर्भयाला श्रध्दांजली वाहण्यासाठी सोलापूरात नारी शक्ती एकवटली

By admin | Published: July 13, 2017 07:13 PM2017-07-13T19:13:06+5:302017-07-13T19:13:06+5:30

-

Woman power collected in Solapur to pay homage to Nirbhaya | निर्भयाला श्रध्दांजली वाहण्यासाठी सोलापूरात नारी शक्ती एकवटली

निर्भयाला श्रध्दांजली वाहण्यासाठी सोलापूरात नारी शक्ती एकवटली

Next


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १३ : कोपर्डी घटनेतील निर्भयाच्या हत्याकांडाला १ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सोलापूरातील पार्क चौकात सकल मराठा समाजाच्यावतीने सायंकाळी हुतात्मा चौकात श्रध्दांजली वाहण्यात आली़ या श्रध्दांजली कार्यक्रमासाठी सोलापूर शहरातील विविध जाती धर्मातील महिला एकत्र आल्या होत्या़ सर्वप्रथम महापौर शोभा बनशेट्टी व विविध महिला संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी चार हुतात्मा पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले़ त्यानंतर पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले़ यानंतर महापौरांसह सर्व महिला पदाधिकारी श्रध्दांजली मंचावर आल्या़ पुण्याहुन खास तयार करून आणण्यात आलेली साडेतीन फुटी मेणबत्ती महापौर शोभा बनशेट्टी यांनी प्रज्वलित केली़ यानंतर स्त्री सन्मानाची शपथ नारी शक्तीला देण्यात आली़ शपथविधीनंतर एक मिनिटाचे मौन पाळून निर्भयाला आदरांजली वाहण्यात आली़ सर्व महिला, विद्यार्थींनी मंचाजवळ येऊन ज्योतीसमोर पुष्प अर्पण केले़ या निर्दोष कन्येला आदरांजली वाहिली़ अत्यंत शांततेत व शिस्तबध्द पध्दतीने हा श्रध्दांजलीचा कार्यक्रम झाला़

Web Title: Woman power collected in Solapur to pay homage to Nirbhaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.