मोहोळमध्ये स्वागत रॅली; तुरुंगातून सुटल्यावर रमेश कदम पहिल्यांदाच सोलापुरात

By Appasaheb.patil | Published: September 24, 2023 07:27 PM2023-09-24T19:27:29+5:302023-09-24T19:27:58+5:30

तुरूंगातून सुटल्यानंतर प्रथमच रमेश कदम मोहोळमध्ये आल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोषात स्वागत केले.

welcome rally in mohol after being released from prison ramesh kadam visited solapur for the first time | मोहोळमध्ये स्वागत रॅली; तुरुंगातून सुटल्यावर रमेश कदम पहिल्यांदाच सोलापुरात

मोहोळमध्ये स्वागत रॅली; तुरुंगातून सुटल्यावर रमेश कदम पहिल्यांदाच सोलापुरात

googlenewsNext

आप्पासाहेब पाटील, सोलापूर : मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रमेश कदम हे आठ वर्षानंतर मोहोळ शहरात दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी हजारो तरूणांनी मोठी गर्दी केली होती. तुरूंगातून सुटल्यानंतर प्रथमच रमेश कदम मोहोळमध्ये आल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोषात स्वागत केले.

रमेश कदम यांची ठाण्यातील मध्यवर्ती कारागृहातून २० ऑगस्ट रोजी सुटका झाली होती. ते आठ वर्षांनंतर कारागृहातून बाहेर आल्याने कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले होते. रविवार २४ व सोमवार २५ सप्टेंबर या दोन दिवसासाठी कदम हे मोहोळ व सोलापुरात आले आहेत. जन आर्शीर्वाद यात्रेच्या निमित्ताने ते कार्यकर्ते, पदाधिकारी व मतदारसंघातील मतदारांशी संवाद साधणार आहेत. जनसंवादाच्या माध्यमातून मोहोळ विधानसभा मतदारसंघातील माता-भगिनी, ज्येष्ठ व मित्रांच्या सहमतीने कायमस्वरूपी जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कोण कोणत्या ठोस उपाययोजना राबवायच्या लागतील त्याचा अंदाज घेऊनच आपले विचार, आपल्या अपेक्षा समजून पुढे  काय करायचं हे ठरविणार असल्याचे माजी आमदार रमेश कदम यांनी सांगितले. रमेश कदम याच्या स्वागतासाठी मोहोळ शहरात हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी दाखल झाले होते. त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

Web Title: welcome rally in mohol after being released from prison ramesh kadam visited solapur for the first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.