वारकरी केंद्रबिंदू मानून पंढरपूरच्या विकासास प्राधान्य : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 04:06 PM2017-10-31T16:06:38+5:302017-10-31T16:08:57+5:30

पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने येणाºया वारकरी-भाविकांना सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य दिले आहे.

Warkari's priority as development center for Pandharpur: Revenue Minister Chandrakant Patil | वारकरी केंद्रबिंदू मानून पंढरपूरच्या विकासास प्राधान्य : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

वारकरी केंद्रबिंदू मानून पंढरपूरच्या विकासास प्राधान्य : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

Next
ठळक मुद्देवारकरी केंद्र बिंदू मानून पंढरपूर, पालखी मार्ग, पालखी तळांचा विकास पंढरपूरातील विविध मठांना महसूलमंत्री भेटी दिल्यामठातील महाराज मंडळनी आपआपल्या समस्यां महसूल मंत्र्यांना सांगितल्या


आॅनलाइन लोकमत सोलापूर
पंढरपूर दि ३१ : पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने येणाºया वारकरी-भाविकांना सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य दिले आहे. राज्य शासन  वारकरी केंद्र बिंदू मानून पंढरपूर, पालखी मार्ग, पालखी तळांचा विकास करीत असल्याची माहिती महसूल, मदत व पुनर्वसन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे दिली.
            कार्तिकी एकादशी निमित्त शासकीय महापुजेसाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील पंढरपूर येथे  आले असून त्यांनी यावेळी पंढरपूरातील विविध मठांना भेटी दिल्या त्या प्रसंगी मठातील महाराज, वारकरी,फडकरी यांच्या संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख, आ़ प्रशांत परिचार, मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, शेखर चरेगावकर, श्रीकांत भारतीय, माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, सहायक पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, तहसिलदार मधुसूदन बर्गे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, अधिकारी व वारकरी-भाविक उपस्थित होते.
            महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पंढपुरातील मच्छिंद्र महाराज मठ, मारुती बुवा कराडकर मठ,  देहूकर महाराज मठ, तात्यासाहेब वासकर महाराज मठ, आप्पासाहेब वासकर महाराज मठ, यादव महाराज मठ यासह अन्य मठांना भेटी देवून मठातील महाराजांकडून वारी, वारकºयांच्या समस्या याबाबत चर्चा केली. यावेळी महसूल मंत्री  पाटील म्हणाले, मठ आणि परिसरात असणाºया समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल.  पंढरपुरातील स्वच्छता, चंद्रभागा नदी पात्राची स्वच्छता ही कामे प्राधान्याने केली जातील.
            यावेळी मठातील महाराज मंडळनी आपआपल्या समस्यां महसूल मंत्र्यांना सांगितल्या. या समस्यांचे निराकरण करण्यात प्राधान्य देण्यात येईल असे महसूल मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Warkari's priority as development center for Pandharpur: Revenue Minister Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.