अंगणवाडीचे असमाधानकारक काम; पाच बालविकास अधिकारी, १४ पर्यवेक्षिकांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 05:12 PM2018-10-31T17:12:35+5:302018-10-31T17:14:11+5:30

आधार नोंदणी राबविण्याचे मुख्य कार्यकारी अधिकाºयांचे आदेश

Uncomfortable work of the anganwadi; 5 Child Development Officer, 14 Notices to Supervisors | अंगणवाडीचे असमाधानकारक काम; पाच बालविकास अधिकारी, १४ पर्यवेक्षिकांना नोटिसा

अंगणवाडीचे असमाधानकारक काम; पाच बालविकास अधिकारी, १४ पर्यवेक्षिकांना नोटिसा

googlenewsNext
ठळक मुद्दे१४ पर्यवेक्षिकांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचे आदेश सीईओ डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिले. महिला व बालकल्याण विभागामार्फत चालविण्यात जाणाºया अंगणवाड्यांच्या विविध कामकाजात हयगय

सोलापूर : झेडपीच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत चालविण्यात जाणाºया अंगणवाड्यांच्या विविध कामकाजात हयगय करणाºया पाच बालविकास अधिकारी व १४ पर्यवेक्षिकांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचे आदेश सीईओ डॉ. राजेंद्र भारूड यांनी  दिले. 

महिला व बालकल्याण विभागाची आढावा बैठक सीईओ भारूड यांनी घेतली. एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत जिल्ह्यात कार्यरत प्रकल्पातील कमी वजनाची बालके, ग्राम बालविकास केंद्र, लाईन लिस्टिंग कामकाज, बाल आधार नोंदणी, आयएसओ अंगणवाडी, हृदयविकार असणाºया बालकांची शस्त्रक्रिया, बालमृत्यू, उपजत मृत्यू, आरोग्य तपासणीबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी देवदत्त गिरी यांच्याकडून माहिती घेतली.

माळशिरस, अकलूज व मंगळवेढा या प्रकल्पात कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण जास्त दिसून आले. या बालकांची श्रेणीवर्धन होण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी पालकांच्या घरी सेविका व पर्यवेक्षिकांनी गृहभेटी द्याव्यात, अशा सूचना भारूड यांनी दिल्या. जुलै, आॅगस्ट महिन्यात राबविण्यात आलेल्या ग्राम बालविकास योजनेत मंगळवेढा, पंढरपूर: २, अक्कलकोटमध्ये सॅम बालकांचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे दिसून आले. बालविकास प्रकल्प अधिकारी व पर्यवेक्षिकांनी फेरसर्वेक्षण करून सॅम बालकांची आकडेवारी निश्चित करावी, अशा सूचना देण्यात आल्या. 

० ते ६ वयोगटातील बालकांची आधार नोंदणी करण्यासाठी अंगणवाडी पर्यवेक्षिकांना यापूर्वीच आधार नोंदणी अधिकारी म्हणून घोषित केले आहे. यात ४४ पर्यवेक्षिकांनी नोंदणी केल्याचे सांगण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुमेद अंदूरकर बालकांच्या आरोग्य तपासणीबाबत अहवाल सादर केल्यावर करमाळा, सांगोला, दक्षिण सोलापूर, पंढरपूर: २ चे काम अत्यल्प असल्याचे आढळले. या कामात कुचराई करणाºया व वेळेत कामे न करणाºया पाच बालविकास प्रकल्प अधिकारी व १४ अंगणवाडी पर्यवेक्षिकांना सक्त ताकीद देत नोटिसा काढण्याचे आदेश दिले. बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, सहायक प्रशासन अधिकारी अनिल जगताप, वरिष्ठ सहायक सचिन साळुंखे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी गिरीश जाधव, विस्तार अधिकारी श्रीकांत मेहेरकर आदी उपस्थित होते. 

उत्कृष्ट काम करणाºयांचा सन्मान
बाल आधार नोंदणीत बार्शी व वैराग विभागाचे काम चांगले असल्याबद्दल बालविकास प्रकल्प अधिकारी ढाकणे व करमाळा प्रकल्पातील कोर्टीच्या पर्यवेक्षिका आतकर यांनी त्यांच्या विभागातील सर्व अंगणवाडी केंद्रे आयएसओ केल्याने अभिनंदनपत्र देऊन दोघांचा सन्मान करण्यात आला. जिल्ह्यातील ६१२ अंगणवाड्यांना आयएसओ मानांकन मिळाले आहे. यामध्ये मंगळवेढा तालुक्यात सर्वाधिक म्हणजे १५५ अंगणवाड्यांचा समावेश आहे. चांगले काम करणारे एक वैद्यकीय अधिकारी व ८ पर्यवेक्षिकांचेही यावेळी कौतुक करण्यात आले. 

Web Title: Uncomfortable work of the anganwadi; 5 Child Development Officer, 14 Notices to Supervisors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.