Un ...! A lot of co-operatives had run the rickshaw from Solapur city | अन...! चक्क सहकारमंत्र्यांनी चालविली सोलापूर शहरातून रिक्षा 
अन...! चक्क सहकारमंत्र्यांनी चालविली सोलापूर शहरातून रिक्षा 

ठळक मुद्देमुद्रा योजनेतून अनेकांना मिळाला रोजगारसहकारमंत्र्यांच्या जनता दरबारात नागरिकांची गर्दीविकासकामांसाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार : सुभाष देशमुख

सोलापूर : कोणतेही काम लहान मोठे नसते याची प्रचिती तेव्हा येते जेव्हा नवीन व्यावसायिक आपला आनंद इतरांसमवेत वाटून घेतो. अशाच एका प्रसंगाचे साक्षीदार झाले सहकार मंत्री सुभाष देशमुख.  
दक्षिण सोलापूर मतदार संघातील नीलम नगर येथील रहिवासी राजू नरोळे यांनी बँक आॅफ इंडियामध्ये मुद्रा कर्ज योजनेतून रिक्षा घेण्यासाठी अर्ज केला होता. यासाठी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या माध्यमातून मदत मिळाल्यामुळे राजू नरोळे यांनी थेट सुभाष देशमुख यांचे संपर्क कार्यालय गाठले. आणि त्यांच्या हस्ते पूजा करून रिक्षा चालवण्याच्या व्यवसायाचा शुभारंभ केला. शुभारंभानंतर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी नरोळे यांना प्रोत्साहन देत, रिक्षा चालविण्याचा आनंद घेतला व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन व्यवसाय उद्योगांना चालना मिळावी. तरुण फक्त नोकरीकडे न वळता त्यांनी स्वावलंबी होऊन स्वत:चा उद्योग निर्माण करावा यासाठी मुद्रा योजनेची घोषणा केली. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुद्रा योजना प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन केले. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी उद्योजक निर्माण करण्यासाठी पुढाकार घेत अनेक तरुणांना  अशाच  ब?्याच बँका मुद्रा योजनेतुन कर्ज देण्यासाठी नकार दर्शवितात.

सर्वसामान्यांना बँकेचे दार कजार्साठी सहजासहजी खुले होत नाहीत, परंतु त्यांना सहकायार्ची भूमिका देत विश्वासार्हता जपल्यास हि प्रथा नक्कीच मोडीत निघेल अशा मताने सहकार मंत्री सुभाष देशमुख हे नेहमीच बँकेशी व्यवहार करा आपली पत निर्माण करा असे आवाहन करीत असतात. राजू नरोळे यांना मुद्रा योजनेतून १ लाख ६५ हजार रुपये मंजूर झाला असून, सुभाष देशमुख यांच्या माध्यमातून व्यवसाय सुरु करण्यासाठी मदत झाल्याने नरोळे यांनी आभार व्यक्त केले.   
यावेळी रिक्षा चालक राजू नरोळे, भाजपा शहराध्यक्ष अशोक निंबर्गी, नगरसेवक श्रीनिवास करली, उपसभापती संदीप टेळे, प्रशांत कडते, कार्यकर्ते डॉ शिवराज सरतापे, प्रथमेश कोरे, माजिद आलुरे, प्रवीण चौधरी, श्रीनिवास पुरुड, शिलारत्न गायकवाड, राजू काकडे आदी उपस्थित होते. 


जनता दरबारमुळे मिळतोय आधार 
सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या जनता दरबारमुळे नागरिकांची अनेक कामे मार्गी लागत असून शैक्षणिक, आरोग्य, सावकारी अशा अनेक समस्यांवर   प्रश्न सोडवण्यासाठी मदत होत आहे, मतदार संघातील प्रलंबित विषय, वषार्नुवर्षे रखडलेली परिसरातील कामे, शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी येणा अडचणी यासाठी दक्षिण सोलापूर मतदार संघातूनच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यातून नागरिकांचा ओढा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या होटगी रोड सोलापूर येथील जनता दरबारकडे असतो. 
 


Web Title: Un ...! A lot of co-operatives had run the rickshaw from Solapur city
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.