उजनीत दौंड, बंडगार्डनमधून विसर्ग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 01:00 PM2018-08-13T13:00:17+5:302018-08-13T13:02:14+5:30

सोलापूर जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविली असली तरीही पुणे जिल्ह्यात मात्र दमदार पाऊस होत आहे.

Ujaneet Daund, started from Bund Garden | उजनीत दौंड, बंडगार्डनमधून विसर्ग सुरू

उजनीत दौंड, बंडगार्डनमधून विसर्ग सुरू

googlenewsNext
ठळक मुद्देपुणे जिल्ह्यातील सहा धरणे १०० भरली सहा धरणे ९० टक्केच्या पुढे गेली आहेतखडकवासल्यासह अनेक धरणातून पाणी सोडल्यामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविली असली तरीही पुणे जिल्ह्यात मात्र दमदार पाऊस होत आहे. यामुळे त्याचा फायदा उजनी धरणाला होत असून, रविवारी बंडगार्डनमधून ११ हजार ७३१ तर दौंड येथून ६ हजार १७५ क्युसेक्सचा विसर्ग उजनीत येत आहे.

रविवारी पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने तेथील धरणात पाणी येत आहे. धरणातील पाण्याची टक्केवारी- टेमघर ५६.६६, वडूज ५५.६७, घोड २४.६०, वरसगाव ९१.०३, वाडेगाव ९६.३५, कळमोडी १००, पानशेत १००, खडकवासला १००, गुंजवणे ६२.०२, चासकमान ९७.५१, पिंपळजोगे २.६९, भामा आसखेड ८६.१५, पवना १००, डिंभे ८७.७२, माणिकडोह ४५.४७ आणि मुळशी धरणात ९७.६६ टक्के पाणीसाठा आहे. गुंजवणी धरणात ७०.०५, नीरा देवधर ९७, भाटघर ९६.९२, वीर धरणात ८४.८९, नाजरे ३.४९ पाणीसाठा झाला आहे. 

पुणे जिल्ह्यातील सहा धरणे १०० भरली आहेत तर सहा धरणे ९० टक्केच्या पुढे गेली आहेत. तर तीन धरणे ७५ टक्केच्या पुढे आहेत. खडकवासल्यासह अनेक धरणातून पाणी सोडल्यामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ चालूच आहे.

उजनी धरणाची स्थिती 
- एकूण पाणीपातळी ४९३.३५० दलघमी
- एकूण पाणीसाठा २३१३.३८ दलघमी
- उपयुक्त पाणी पातळी ५१०.५७ 
- टक्केवारी ३३.६५ टक्के
- एकूण टीएमसी ८१.६४
- उपयुक्त टीएमसी १७.९९
- बंडगार्डन विसर्ग ११ हजार ७३१ क्युसेक्स
- दौंड विसर्ग ६१७५ क्युसेक्स 
- कालवा विसर्ग ३२५० क्युसेक्स
- सीना बोगदा ९०० क्युसेक्स

Web Title: Ujaneet Daund, started from Bund Garden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.