नवीन मतदान यंत्रामुळे लोकसभेसाठी सोलापूर जिल्ह्यात अडीचशे मतदान केंद्रे वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 05:19 PM2019-02-04T17:19:45+5:302019-02-04T17:21:45+5:30

सोलापूर : लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाची पोहोच देणाºया नवीन मशीनचा वापर मतदानासाठी करण्यात येणार आहे. मात्र या मशीनकडून केवळ १ ...

Two polling stations will increase in the Solapur district due to the new polling machine | नवीन मतदान यंत्रामुळे लोकसभेसाठी सोलापूर जिल्ह्यात अडीचशे मतदान केंद्रे वाढणार

नवीन मतदान यंत्रामुळे लोकसभेसाठी सोलापूर जिल्ह्यात अडीचशे मतदान केंद्रे वाढणार

Next
ठळक मुद्देअधिकाºयांच्या बैठकांवर बैठका : निवडणुकीच्या पूर्व तयारीसाठी महसूल खाते झाले व्यस्तमूळ रहिवासी असलेल्या उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्या बदल्या करण्याच्या हालचाली सुरु

सोलापूर : लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाची पोहोच देणाºया नवीन मशीनचा वापर मतदानासाठी करण्यात येणार आहे. मात्र या मशीनकडून केवळ १ हजार ४०० मतांची पावती देण्याची तांत्रिक क्षमता आहे. त्यामुळे दीड हजारापेक्षा जास्त मतदान असणाºया केंद्रांवर मतदान कसे घ्यावे, असा प्रश्न निवडणूक यंत्रणेमुळे उभा राहिला आहे. दुसºया मशीनसाठी नवीन मतदान कक्षाची व्यवस्था करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

नवीन मतदान यंत्राच्या पावतीच्या मर्यादेमुळे लोकसभा निवडणुकीसाठी २५0 ठिकाणी मतदान केंद्रे वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी करण्यासाठी महसूल खाते शनिवारी सकाळी अकरापासून ते सायंकाळी उशिरापर्यंत बैठकांवर बैठकांचा जोर जिल्हाधिकारी कार्यालयात दिसून येत येत होता. 

राज्य निवडणूक आयोग व केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सातत्याने जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व तहसीलदारांची आढावा बैठक घेण्यात येत आहे. यापुढील दिवसांत महसूल खाते केवळ निवडणुकीच्या कामातच अधिक व्यस्त असणार आहे. निवडणूक आयोगाकडून प्रत्येक मतदान केंद्राकडून मतदान केंद्र व त्याचे असणारे स्वरुप, संवेदनशील मतदान केंद्रे आदींबाबत सातत्याने कसून माहिती घेण्यात येत आहे. नवीन मतदान यंत्राची प्रात्यक्षिके किती मतदारांपर्यंत पोहोचली आहेत, मतदार यादीत अजूनही किती मतदारांची छायाचित्रे नाहीत आदींबाबतही विचारणा आयोगाकडून होत आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी सातत्याने दिल्ली व मुंंबई येथून जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाºयांकडून व्हिडीओ कॉन्फरसिंगने माहिती घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. नवीन मतदान यंत्रामुळे सुमारे २५0 अधिक मतदान केंदे्र वाढण्याची शक्यता असल्याने या मतदान केंद्रांसाठी अतिरिक्त केंद्र अधिकारी, मतदान अधिकारी व पोलीस व्यवस्था आदींची व्यवस्था करावी लागणार आहे. त्यामुळे हा विषय सध्या महसूल खात्यातील अधिकाºयांसाठी आव्हानाचा ठरला आहे. 

जिल्ह्यातील अधिकाºयांच्या बदल्या होणार 
लोकसभा निवडणुकीदरम्यान सोलापूर जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्या बदल्या करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन उपजिल्हाधिकारी यांच्यासह दोन तहसीलदारांच्या बदल्या येत्या आठ दिवसांत होण्याची शक्यता आहे. 

Web Title: Two polling stations will increase in the Solapur district due to the new polling machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.