शेतकऱ्यांचे खावटी कर्जही माफ - देशमुख

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2018 04:44 AM2018-11-04T04:44:35+5:302018-11-04T04:44:50+5:30

शेतकरी कर्जमाफीत खावटी कर्जाचाही समावेश केला आहे. नागरी बँकांबाबत मागणी आल्यास कर्जमाफीचा विचार करू, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

Subhash Deshmukh News | शेतकऱ्यांचे खावटी कर्जही माफ - देशमुख

शेतकऱ्यांचे खावटी कर्जही माफ - देशमुख

googlenewsNext

सोलापूर  - शेतकरी कर्जमाफीत खावटी कर्जाचाही समावेश केला आहे. नागरी बँकांबाबत मागणी आल्यास कर्जमाफीचा विचार करू, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
केंद्र व राज्य शासनाला चार वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विकासकामांबद्दल माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.
देशमुख म्हणाले, राज्यातील ४७ लाख शेतक-यांचे कर्ज शासनाने माफ केले आहे. यात आतापर्यंत बँकेची उर्वरित थकबाकी भरलेल्या शेतकºयांच्या खात्यावर १७ हजार कोटी जमा केले आहेत. उर्वरित शेतकºयांना ३१ डिसेंबरपर्यंत योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
कर्जमाफी योजनेपासून कोणताही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी यादी अपडेट करण्याचे काम सुरूच आहे. ज्यांचे नाव यादीत नसेल त्या शेतकºयांनी तालुका सहनिबंधकांकडे अर्ज करावयाचा आहे. आतापर्यंत अशा पद्धतीने १० हजार शेतकºयांची नावे नोंदवली गेली आहेत, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Subhash Deshmukh News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.