एसटीचे यात्री निवास वारकरी सप्रंदायाला समर्पित; दिवाकर रावते यांची घोषणा

By appasaheb.patil | Published: March 3, 2019 07:01 PM2019-03-03T19:01:16+5:302019-03-03T19:04:27+5:30

  पंढरपूर  :- संताचे व वारकऱ्यांचे माहेरघर असलेल्याल्या पंढरीत एसटी महामंडळाच्यावतीने 33 कोटी रुपये खर्च करुन भव्य असे यात्री ...

ST passenger resides dedicated to Warkari Sapranda; Divakar Raote's announcement | एसटीचे यात्री निवास वारकरी सप्रंदायाला समर्पित; दिवाकर रावते यांची घोषणा

एसटीचे यात्री निवास वारकरी सप्रंदायाला समर्पित; दिवाकर रावते यांची घोषणा

Next
ठळक मुद्देएसटी महामंडळाच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या यात्री निवास व बसस्थानकाच्या भुमिपूजन सोहळाप्रवाशांना आधारकार्ड सलंग्न स्मार्टकार्डचे औपचारिक वाटप तसेच एसटीच्या विनावातानुकुलीत शयनायन बसचे उदघाटन

 पंढरपूर  :- संताचे व वारकऱ्यांचे माहेरघर असलेल्याल्या पंढरीत एसटी महामंडळाच्यावतीने 33 कोटी रुपये खर्च करुन भव्य असे यात्री निवास व सुसज्य असे बसस्थानक बांधण्यात येणार असून, हे वारकरी संप्रदायाच्या प्रथा, परंपरेला समर्पित करीत असल्याची घोषणा परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली.

एसटी महामंडळाच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या यात्री निवास व बसस्थानकाच्या भुमिपूजन सोहळा संत नामदेवांचे वंशज ह.भ.प. माधव महाराज नामदास, संत एकनाथांचे वंशज ह.भ.प. रावसाहेब गोसावी महाराज आणि संत तुकारामांचे वंशज ह.भ.प. संजय महाराज देहूकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला . या सोहळया प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष रणजीत सिंह देओल, एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक प्रतापसिंह सावंत, मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्यअधिकारी श्रीकांत भारती, उपमहाव्यस्थापक राहुल तोरो, सुहास जाधव, विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड तसेच महाराज मंडळी उपस्थित होते.

यावेळी परिवहन मंत्री रावते बोलताना म्हणाले, वारकरी सप्रंदाय हा  प्रमुख भक्तीचा मार्ग असून, या मार्गाचे आराध्य दैवत पांडूरंग हा अवघ्या महाराष्ट्राचे भक्तीपीठ आहे. वारकरी हा महाराष्ट्राचे संस्कार व संस्कृती जपणारा आहे. या संस्काराच्या बळावर पंढरीत येणाऱ्या भाविकांची मोठ्या प्रमाणात संख्या वाढत आहे. येणाऱ्या वारकरी व भाविक प्रवाशांना माफक दरात राहण्याची सोय व्हावी यासाठी एसटी महामंडळाच्या वतीने यात्री निवासाचा उपयोग होणार असल्याचे  त्यांनी यावेळी सांगितले.

 एसटी महामंडळाने विविध सवलतधारी प्रवाशांना प्रवाशांना आधारकार्ड सलंग्न स्मार्टकार्ड देण्याचा निर्णय घेतला असून, या स्मार्टकार्डचे औपचारिक वाटप तसेच एसटीच्या विनावातानुकुलीत शयनायन बसचे उदघाटन  परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले

यावेळी संत नामदेवांचे वंशज ह.भ.प. माधव महाराज नामदास, संत एकनाथांचे वंशज ह.भ.प. रावसाहेब गोसावी महाराज आणि संत तुकारामांचे वंशज ह.भ.प. संजय महाराज देहूकर आदी महाराज मंडळीचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास मंदीर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर, महादेव महाराज शिवणीकर, , तनपुरे महाराज , आदी महाराज मंडळी यांच्यासह राज्याच्या विविध भागातून आलेले भाविक व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                   

Web Title: ST passenger resides dedicated to Warkari Sapranda; Divakar Raote's announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.