सोलापुरकरांना आता चार दिवसाआड मिळणार पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 10:41 AM2018-11-15T10:41:23+5:302018-11-15T10:43:54+5:30

मनपा सभेपुढे प्रस्ताव: सेनेचा उड्डाण पुलास विरोध

Solapur will now get water for four days | सोलापुरकरांना आता चार दिवसाआड मिळणार पाणी

सोलापुरकरांना आता चार दिवसाआड मिळणार पाणी

Next
ठळक मुद्देऔज बंधाºयातील पाणी संपल्यामुळे चार दिवसाआड पाणीपुरवठाऔज व चिंचपूर बंधाºयातील पाणीसाठा संपुष्टातउन्हाचा कडाका व हिप्परगा तलावातून उपसा बंद

सोलापूर : औज बंधाºयातील पाणी संपल्यामुळे चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याबाबत ऐनवेळी घेतलेल्या निर्णयाची माहिती प्रशासनाने शनिवारी होणाºया महापालिकेच्या सभेकडे पाठविली आहे. सध्या पाण्याची कमतरता भासत असून, हा निर्णय कायम करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

२४ नोव्हेंबर रोजी महापालिकेची सभा बोलावण्यात आली आहे. या सभेत पुरवणी विषयाद्वारे पाणी पुरवठ्याचा प्रस्ताव प्रशासनाने पाठविला आहे. २९ आॅक्टोबर रोजी औज व चिंचपूर बंधाºयातील पाणीसाठा संपुष्टात आला.

उजनी धरणातून २४ आॅक्टोबर रोजी पाणी सोडण्यात आले, पण पाणी औज बंधाºयास पोहोचण्यास विलंब लागल्याने ३0 आॅक्टोबरपासून चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला. तेव्हापासून आजमितीपर्यंत चार दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. प्रशासनाने हा प्रस्ताव माहितीस्तव सभागृहाकडे पाठविला आहे. उन्हाचा कडाका व हिप्परगा तलावातून उपसा बंद झाल्याने शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय कायम करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. पण याला सभागृहात मान्यता दिली जाणार नाही, अशी माहिती सभागृहनेते संजय कोळी यांनी दिली. 

त्याचबरोबर सेनेने शहरातून जाणाºया उड्डाण पुलास विरोध केला आहे. तसा प्रस्ताव भारतसिंग बडुरवाले, उमेश गायकवाड, अनिता मगर, हंचाटे यांनी सभेकडे दाखल केला आहे. शहरातून जाणाºया जड वाहनांचा प्रश्न गंभीर आहे. यासाठी उड्डाण पुलाऐवजी रिंगरूट किंवा बायपासचे काम करावे. त्यामुळे उड्डाण पुलाच्या केवळ २0 टक्के खर्चात हे काम होईल. तसेच उड्डाण पुलात जाणारी गोरगरिबांची घरे वाचतील. तसेच महापालिकेवर कर्जाचा डोंगर आहे.

ठेकेदारांची थकीत बिले देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी २00 कोटींचे विशेष अनुदान द्यावे असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. मनपा कर्मचाºयांची वैद्यकीय प्रतिपूर्ती रोजंदारी व बदली कामगारांना वगळून करणे, प्रभाग १५ मधील दोन मुताºया पाडणे, आरोग्य विभागातील कर्मचाºयांना इंधनभत्ता वाढ, नगरअभियंता कार्यालयाकडील सेवाकरात वाढ, रमाई आवास योजनेतील पात्र लाभार्थ्यास बांधकाम परवानगी शुल्कात सूट देणे,वृक्ष प्राधिकरण समितीची नियुक्ती, पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमासाठी तीन दिवस हुतात्मा स्मृती मंदिर नि:शुल्क देणे आदी प्रस्ताव देण्यात आले आहेत. 

Web Title: Solapur will now get water for four days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.