सोलापूर ‘लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्ड्स’चे गुरूवारी थाटात वितरण, रंगभवन सभागृहात रंगणार कार्यक्रम, शेकडो सरपंचाच्या उपस्थित होणार दिमाखात कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 12:02 PM2018-01-03T12:02:19+5:302018-01-03T12:11:41+5:30

संपूर्ण राज्य आणि सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अ‍ॅवॉडर््स’च्या विजेत्यांची ज्युरी मंडळाने आज निवड केली असून, शेकडो सरपंचांच्या उपस्थितीत गुरुवार दि. ४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता येथील छत्रपती रंगभवन सभागृहात या मानाच्या अ‍ॅवॉडर््सचे वितरण होणार आहे.

Solapur will be organized on Thursday in the 'Lokmat Sarpanch Awards', programs to be played at Rangbhavan auditorium, hundreds of sarpanchs will be present in the program | सोलापूर ‘लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्ड्स’चे गुरूवारी थाटात वितरण, रंगभवन सभागृहात रंगणार कार्यक्रम, शेकडो सरपंचाच्या उपस्थित होणार दिमाखात कार्यक्रम

सोलापूर ‘लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्ड्स’चे गुरूवारी थाटात वितरण, रंगभवन सभागृहात रंगणार कार्यक्रम, शेकडो सरपंचाच्या उपस्थित होणार दिमाखात कार्यक्रम

googlenewsNext
ठळक मुद्देबीकेटी टायर्स हे या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक, ‘पतंजली आयुर्वेद’ हे प्रायोजक तर ‘महिंद्रा ट्रॅक्टर्स’ हे सहप्रायोजक आहेतशेकडो सरपंचांच्या उपस्थितीत गुरुवार दि. ४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता येथील छत्रपती रंगभवन सभागृहात या मानाच्या अ‍ॅवॉडर््सचे वितरण होणार आहे.‘लोकमत’ नेहमीच प्रयत्नपूर्वक अभिनव आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आघाडीवर राहिला आहे


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ३  : संपूर्ण राज्य आणि सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अ‍ॅवॉडर््स’च्या विजेत्यांची ज्युरी मंडळाने आज निवड केली असून, शेकडो सरपंचांच्या उपस्थितीत गुरुवार दि. ४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता येथील छत्रपती रंगभवन सभागृहात या मानाच्या अ‍ॅवॉडर््सचे वितरण होणार आहे.
‘लोकमत भवन’मध्ये दुपारी झालेल्या ज्युरी मंडळाच्या बैठकीत सोलापूर जिल्ह्यातील आदर्श सरपंचांची निवड करण्यात आली. ज्युरी मंडळामध्ये कृषिभूषण नवनाथ तथा नानासाहेब कसपटे व पर्यावरणवादी ज्येष्ठ कार्यकर्ते सुभेदार बाबुराव पेठकर यांचा समावेश होता.
गुरुवार, दि. ४ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांच्या हस्ते विजेत्या सरपंचांना अ‍ॅवॉर्ड प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी जिल्ह्यातील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य बहुसंख्येने उपस्थित राहणार आहेत.
गावखेड्याच्या बदलाची नोंद घेण्यासाठी गावच्या कारभाºयांना ‘बीकेटी टायर्स प्रस्तुत लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्ड्स-२०१७’ने गौरविण्याचा निर्णय ‘लोकमत’ने घेतला. गावाच्या विकासासाठी झटणाºया सरपंचांना वैयक्तिक पातळीवर गौरविणारा हा पहिलाच पुरस्कार आहे. बीकेटी टायर्स हे या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक, ‘पतंजली आयुर्वेद’ हे प्रायोजक तर ‘महिंद्रा ट्रॅक्टर्स’ हे सहप्रायोजक आहेत. पहिल्याच वर्षी या पुरस्कारांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. प्रचंड चुरस आणि उत्सुकता निर्माण झाली आहे. 
सरपंचांनी गावातील जल, वीज व्यवस्थापन, शिक्षण, स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सेवा, ग्रामरक्षण, पर्यावरण, प्रशासन-लोकसहभाग, रोजगार, कृषी या ११ कॅटेगरीत केलेल्या कामांची पाहणी करून या प्रत्येक क्षेत्रासाठी पुरस्कार दिला जाणार आहे. 
याशिवाय ‘उदयोन्मुख नेतृत्व’ व सर्वांगीण काम करणाºया सरपंचासाठी ‘सरपंच आॅफ द ईयर’ असे दोन स्वतंत्र पुरस्कार आहेत. असे एकूण १३ पुरस्कार दिले जाणार आहेत. सुरुवातीला जिल्हा पातळीवर हे पुरस्कार दिल्यानंतर या विजेत्यांचे राज्यपातळीसाठी नामांकन होईल. त्यातून राज्यातील आदर्श सरपंच ठरतील. राज्यात कोण आदर्श ठरणार? याची ग्रामीण महाराष्टÑाला प्रचंड उत्सुकता आहे. 
पार्लमेंट ते पंचायत 
‘लोकमत’ने आदर्श खासदारांना गौरविण्यासाठी पार्लमेंटरी अ‍ॅवॉडर््स सुरू केले आहेत. अशा प्रकारचा पुरस्कार सुरू करणारा ‘लोकमत’ हा पहिला माध्यम समूह ठरला आहे. संसद ते गाव हा प्रवास करत ‘लोकमत’ आता सरपंचांनाही गौरवित आहे. राज्यात पुरस्काराचे उत्स्फूर्तपणे स्वागत झाले आहे.
सोहळ्यात होणार मंथन 
सरपंच अ‍ॅवॉडर््सच्या जिल्हापातळीवरील सोहळ्यास मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. ग्रामविकास व पंचायतराजबाबत महत्त्वपूर्ण मंथन या सोहळ्यात घडणार आहे. जिल्हाभरातून सरपंच या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. 
--------------------
साक्षीदार व्हा !
गावाच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न पाहणाºया व त्या स्वप्नांना मूर्तरूप देण्यासाठी झटणाºया मेहनती व कर्तबगार सरपंचांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी ‘लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्ड्स’ या सोहळ्याचे आपण साक्षीदार व्हावे, असे आवाहन ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आले आहे.
------------------
‘लोकमत’ नेहमीच प्रयत्नपूर्वक अभिनव आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आघाडीवर राहिला आहे. यापूर्वी ‘लोकमत’ने राज्य विधिमंडळापासून ते देशाचे सर्वोच्च कायदे मंडळ असणाºया पार्लमेंटरी सदस्यांचा गौरव केला आहे़ तळागाळातील व्यक्तींच्या आदर्श कार्याला ओळखून लोकशाहीला बळकटी देण्यासाठीच ‘लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्ड्स’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे़ आपले गाव हाच आपला अभिमान आहे आणि इथेच आमची लोकशाही मूल्ये सर्वांत महत्त्वाची असली पाहिजेत. जय हिंद!
-विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह
------------------
भारतीय ट्रॅक्टर उद्योगात निर्विवाद नेता म्हणून आम्ही नेहमी कृषी उत्पादकता आणि ग्रामीण समृद्धी वाढविण्यासाठी नवीन कृषी तंत्रज्ञान विकसित केले़ ते शेतकºयांपर्यंत पोहोचविले़ शेतकºयांशी असलेले आमचे नाते अधिक दृढ करण्यासाठी आम्ही लोकमतसोबत सरपंच पुरस्कार देण्यासाठी सहभाग घेतला आहे़
    - रवींद्र शहाणे, उपाध्यक्ष (पणन),     महिंद्रा फार्म डिव्हिजन. 
-----------------
लोकमत सरपंच पुरस्कारासाठी राज्यभरातून मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहून आनंद झाला़ असा अभूतपूर्व कार्यक्रम घेण्यात बीकेटी टायर्सला आनंद होत आहे़ बीकेटी टायर्स मीडिया प्रमोशन आणि रोड शो यांचाही आम्हाला चांगला फायदा झाला आहे़ आमच्या जागतिक दर्जाच्या उत्पादनांमध्ये लोकांची रुची वाढत आहे़
    -राजीव पोद्दार, सहव्यवस्थापकीय     संचालक, बीकेटी टायर्स

Web Title: Solapur will be organized on Thursday in the 'Lokmat Sarpanch Awards', programs to be played at Rangbhavan auditorium, hundreds of sarpanchs will be present in the program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.