Solapur Brand; गृहउद्योगाद्वारे सोलापुरी भाकरीचा ब्रॅण्ड परराज्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 02:49 PM2019-02-11T14:49:35+5:302019-02-11T14:54:54+5:30

रेवणसिद्ध जवळेकर  सोलापूर : सकाळचा स्वयंपाक अन् नंतरची भांडीधुणी झाल्यावर गृहिणींना पुढे वेळच वेळ असतो. नेमक्या याच वेळेत सूचलेली ...

Solapur Brand; Solapur is the home of the society! | Solapur Brand; गृहउद्योगाद्वारे सोलापुरी भाकरीचा ब्रॅण्ड परराज्यात !

Solapur Brand; गृहउद्योगाद्वारे सोलापुरी भाकरीचा ब्रॅण्ड परराज्यात !

googlenewsNext
ठळक मुद्देमुंबई, पुणेसह कर्नाटक, आंध्रप्रदेश अन् अगदी गुजरातपर्यंत सोलापुरी भाकरीचा ब्रॅण्ड पोहोचविला मकरसंक्रातीदिनी मोठ्या प्रमाणावर बाजरीच्या भाकरीची मागणीहोटगी रोडवरील शेखर सावजी यांच्याकडे येणाºया ग्राहकांनी या भाकरीला चांगलीच पसंती दिली

रेवणसिद्ध जवळेकर 

सोलापूर : सकाळचा स्वयंपाक अन् नंतरची भांडीधुणी झाल्यावर गृहिणींना पुढे वेळच वेळ असतो. नेमक्या याच वेळेत सूचलेली चांगली कल्पना सत्यात उतरेल, यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. मात्र चौथीपर्यंत शिकलेल्या सविता जगदिश मैंदर्गी या गृहिणीनं सूचवलेली कल्पना सत्यात आणत भाकरी विक्रेत्या म्हणून एक यशस्वी उद्योजिका बनली आहे. त्यांनी मुंबई, पुणेसह कर्नाटक, आंध्रप्रदेश अन् अगदी गुजरातपर्यंत सोलापुरी भाकरीचा ब्रॅण्ड पोहोचविला आहे. 

होटगी मार्गावरील विमानतळासमोरील हत्तुरे नगरातील एका घरात सविता या पती जगदिश, प्रदीप आणि संदीप या दोन मुलांसमवेत संसाराचा गाडा हाकत आहे. त्यांचे पती जगदिश हे औद्योगिक वसाहतीतील एलएचपी कंपनीत नोकरीस आहेत. सकाळची कामे अन् स्वयंपाक आटोपल्यावर मुले शाळेत अन् पतीराज ड्यूटीवर गेले की पुढे निवांत वेळ मिळायचा. रिकामा वेळ म्हणजे ‘खाली दिमाग सैतानका.. असे म्हटले जाते. सविता मैंदर्गी  यांनी मात्र मिळणाºया रिकाम्या वेळेची चांगलीच संधी साधली. घरच्या घरी भाकºया बनवून त्या विकल्या तर... हा विचार त्यांनी पतीराजासमोर बोलून दाखवला. पतीराजानेही त्यास होकार दिला. 

२००८ साली त्या स्वत: २०-२५ भाकºया बनवू लागल्या. घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या हॉटेलमध्ये, खानावळीत त्या भाकºया विकू लागल्या. हॉटेल मालकांकडून चांगला प्रतिसाद मिळत गेला आणि सविता यांनी हा छोटेखानी व्यवसायाचा विस्तार केला. होटगी रोडवरील शेखर सावजी यांच्याकडे येणाºया ग्राहकांनी या भाकरीला चांगलीच पसंती दिली.

उत्साह वाढला अन् सविता मैंदर्गी यांनी घरातील किचन रुमला भाकरीच्या कारखान्याचे स्वरुप दिले. आज शहरातील अनेक हॉटेल्सच नव्हे तर पुणे, मुंबई, बंगळुरुपर्यंत या भाकºया पोहोचत आहेत. भाकºया पोहोच करण्याचे, वसुली करण्याचे काम पती जगदिश हे करीत असताना दोन्ही मुलांचीही मदत या व्यवसायात होत आहे. मकरसंक्रातीदिनी मोठ्या प्रमाणावर बाजरीच्या भाकरीची मागणीही त्यांच्याकडे असते. 

एक भाकरी बनविण्यासाठी ८० पैसे मजुरी
सविता मैंदर्गी यांच्या घरात सकाळी ६ ते १०.३० आणि ११ ते सायंकाळी ५ या वेळेत १५ महिला भाकºया बडवत असतात. एका भाकरीमागे त्यांना ८० पैसे मिळतात. ही मजुरी ८५ पैसे करण्याचे सविता यांनी बोलून दाखवले. 

 

गृहउद्योगाचा विस्तार करु
सध्या घरातच माझा भाकरी बनविण्याचा गृहउद्योग सुरु केला आहे. सोलापूरची कडक भाकरी सर्वत्र प्रसिद्ध आहे. सोलापुरी चादरीबरोबर कडक भाकरीचे ब्रॅडिंग होणे गरजेचे आहे. शासकीय योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य मिळाले तर गृहउद्योगाचा विस्तार करणार असल्याचे सविता मैंदर्गी यांनी सांगितले. 

मला रोजगार मिळाला. मजुरीच्या पैशातून संसाराला थोडीफार मदत होते. सविता यांचा हा गृहउद्योग आणखी वाढवा.
-पार्वती हिप्परगी, 
महिला कामगार.

Web Title: Solapur Brand; Solapur is the home of the society!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.