मोठी बातमी; सोलापूर शहरात कोरोना वाढतोय, रूग्णसंख्या पोहोचली ४१ वर

By Appasaheb.patil | Published: March 26, 2023 07:04 PM2023-03-26T19:04:32+5:302023-03-26T19:04:40+5:30

नई जिंदगी, शेळगी, रामवाडी परिसरात आढळले रूग्ण, एकाच दिवसात आढळले ८ बाधित

solapur big news; Corona is increasing in Solapur city, the number of patients reached 41 patients | मोठी बातमी; सोलापूर शहरात कोरोना वाढतोय, रूग्णसंख्या पोहोचली ४१ वर

मोठी बातमी; सोलापूर शहरात कोरोना वाढतोय, रूग्णसंख्या पोहोचली ४१ वर

googlenewsNext

सोलापूर : शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकाच दिवसात ८ कोरोना रुग्ण आढळून आले. यातील ४ पुरुष तर ४ स्त्री रुग्ण आहेत. सोलापुरातील रुग्णसंख्या ४१ वर पोहोचली आहे.

दरम्यान, शनिवारी १५७ जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यातील १४९ रुग्ण निगेटिव्ह आढळून आले तर ८ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. मुद्रा सनसिटी, नई जिंदगी, रामवाडी, साबळे, शेळगी नागरी आरोग्य केंद्र परिसरात कोरोनाचे नवे रूग्ण आढळून आले आहेत. ० ते १५ वयोगटातील १, ३१ ते ५० वयोगटातील २, ५१ ते ६० वयोगटातील १ व ६० वर्षापुढील रुग्ण ४ आढळून आले आहेत. सोलापूर शहरात आतापर्यंत ३४ हजार ६३५ तर मृतांची संख्या १ हजार ५१९ जणांचा मृत्यू झाला आहे.

सध्या शहरातील बाधितांची संख्या ४१ एवढी आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला असून लोकांनी मास्क वापरावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. ज्या रुग्णांनी अद्यापपर्यंत पहिला, दुसरा व बुस्टर डोस घेतला नाही, त्या रुग्णांनी त्वरित सोलापूर महानगरपालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्यावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Web Title: solapur big news; Corona is increasing in Solapur city, the number of patients reached 41 patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.