शाहरुख म्हणाला - Wow सोलापूरकर... लव्ह यू ऑल! थिएटरमध्ये नाचले चाहते

By शीतलकुमार कांबळे | Published: September 9, 2023 03:53 PM2023-09-09T15:53:17+5:302023-09-09T15:53:39+5:30

जवान सिनेमाच्या स्क्रिनिंग दरम्यानच्या व्हिडीओवर शाहरुखने केलं ट्वीट

Shah Rukh said - Wow Solapurkar... Love you all! Dance fans in the theater | शाहरुख म्हणाला - Wow सोलापूरकर... लव्ह यू ऑल! थिएटरमध्ये नाचले चाहते

शाहरुख म्हणाला - Wow सोलापूरकर... लव्ह यू ऑल! थिएटरमध्ये नाचले चाहते

googlenewsNext

शीतलकुमार कांबळे, सोलापूर : शाहरुख खानचाजवान चित्रपट देशभरासह सोलापुरात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला सोलापूरकर रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत बंदा हो जिंदा गाण्यावर थिरकले. हा व्हिडीओ शाहरुखने ट्वीट करत सोलापूरकर वॉव.. लव्ह यू ऑल ! असे ट्वीट केले. सोलापूरात शाहरुख खानचे अनेक चाहते आहेत. त्यामुळे त्याच्या चित्रपटाला चांगली गर्दी येथे होतच असते. फक्त गर्दीच होत नाही तर थेएटरमध्ये गाण्याच्या तालावर येथील तरुण थिरकतात. हा अनुभव शाहरुख खानने घेतला. बंदा हो जिंदा हो या गाण्यावर मोबाईलची टॉर्च दाखवत तरुणांनी नृत्य केले.

शाहरुख खान युनिव्हर्स फॅन क्लब या ट्वीटर अकाउंटवरुन सोलापुरातील थिएटरचा व्हीडिओ ट्वीट करण्यात आला होता. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर शाहरुख खाननेही तो व्हिडीओ ट्वीट केला. सोलापूर वॉव ! यू बॉईज अँड गर्ल आर सो वंडरफूल. लव्ह यू ऑल. अलवेज बी हॅप्पी अँड हेल्दी. असे ट्वीट केले आहे.

Web Title: Shah Rukh said - Wow Solapurkar... Love you all! Dance fans in the theater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.