सोलापूर बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी संतोष न्हावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 11:31 AM2018-08-07T11:31:43+5:302018-08-07T11:34:03+5:30

Santosh Nahavkar, president of Solapur Bar Association | सोलापूर बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी संतोष न्हावकर

सोलापूर बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी संतोष न्हावकर

Next
ठळक मुद्देविधी विकास पॅनलला २ तर विधीसेवा पॅनलला ३ जागास्वप्नाली चालुक्य यांनी सहसचिवपदासाठीची निवडणूक जिंकली

सोलापूर : सोलापूर बार असो.ची सन २०१८-१९ च्या निवडणुकीसाठी मतदान झाले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अ‍ॅड. संतोष न्हावकर तर उपाध्यक्षपदी अ‍ॅड. संतोष पाटील विजयी झाले. या निवडणुकीत  विधी विकास पॅनलला २ तर विधीसेवा पॅनलला ३ जागा मिळाल्या.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत विधीविकास पॅनलचे प्रमुख संतोष न्हावकर आणि त्यांच्याच पॅनलमधील स्वप्नाली चालुक्य यांनी सहसचिवपदासाठीची निवडणूक जिंकली.

अ‍ॅड. राजेंद्र फताटे यांच्या नेतृत्वाखालील  विधीसेवा पॅनलमधील उपाध्यक्ष अ‍ॅड. संतोष पाटील , सचिव अ‍ॅड. संतोष होसमनी , खजिनदार अ‍ॅड. महिंद्रा वड्डेपल्ली  यांनी विजयश्री खेचून आणली. पॅनलप्रमुख फताटे यांना हार पत्करावी लागली. या निवडणुकीतील तिसºया जनसेवा पॅनलला एकही जागा मिळवता आला नाही. सोमवारी झालेल्या निवडणुकीत ११३४ पैकी ९७५ जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता. 

विजयी उमेदवार आणि मते 

  • - अध्यक्ष अ‍ॅड. संतोष न्हावकर - ३९४
  • - उपाध्यक्ष अ‍ॅड. संतोष पाटील -४०१
  • - सचिव अ‍ॅड. संतोष होसमनी - ५३०
  • - सहसचिव - अ‍ॅड. स्वप्नाली चालुक्य -७५३
  • - खजिनदारपदी - अ‍ॅड. महिद्रा वड्डेपल्ली -३८८

तीन संतोष विजय
- सोलापूरच्या बार असोसिएशनच्या निवडणुकीत संतोष नावाचे तीन उमेदवार निवडून आल्याने हा चर्चेचा विषय बनला होता. 

Web Title: Santosh Nahavkar, president of Solapur Bar Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.