राजाभाऊ सरवदे हे सुशीलकुमारांचे एजंटच; रिपाइंचे नागेश कांबळे याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 03:12 PM2019-02-06T15:12:34+5:302019-02-06T15:14:20+5:30

करमाळा : रिपाइंचे प्रांतिक सरचिटणीस व महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे अध्यक्ष राजा सरवदे हे सुशीलकुमार श्ािंदे यांचे एजंट ...

Rajabhau Sarvade is the agent of Sushil Kumar. The allegations of Ripai's Nagesh Kamble | राजाभाऊ सरवदे हे सुशीलकुमारांचे एजंटच; रिपाइंचे नागेश कांबळे याचा आरोप

राजाभाऊ सरवदे हे सुशीलकुमारांचे एजंटच; रिपाइंचे नागेश कांबळे याचा आरोप

googlenewsNext
ठळक मुद्देकोणालाही विश्वासात न घेता निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकाºयांचे खच्चीकरण करण्याचे काम - येत्या ६ फेब्रुवारी रोजी सोलापूर येथे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा

करमाळा : रिपाइंचे प्रांतिक सरचिटणीस व महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे अध्यक्ष राजा सरवदे हे सुशीलकुमार श्ािंदे यांचे एजंट आहेत, असा आरोप रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष नागेश कांबळे यांनी पत्रकार परिषदेत केला.

करमाळा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली असलेला रिपाइं पक्ष राजा सरवदे यांच्या मालकीचा नसून, ते पक्षात हुकूमशाही गाजवत आहेत. कोणालाही विश्वासात न घेता निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकाºयांचे खच्चीकरण करण्याचे काम करीत आहेत. त्यांची पक्षातील मक्तेदारी मोडून काढण्यासाठी व आमचे नेते रामदास आठवले यांना राजा सरवदे यांची क्षमता दाखवून देण्यासाठी एक शक्तिप्रदर्शन म्हणून येत्या ६ फेब्रुवारी रोजी सोलापूर येथे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बनसोडे अन् भोसले यांची हकालपट्टी
च्जिल्हा सरचिटणीस जितेंद्र बनसोडे, पंढरपूर व कार्याध्यक्ष सोमनाथ भोसले, माळशिरस हे पक्षविरोधी कारवाया करीत असल्याने या दोघांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष अशोक सरवदे यांनी सांगितले. नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असल्याचेही कांबळे यांनी सांगितले.

Web Title: Rajabhau Sarvade is the agent of Sushil Kumar. The allegations of Ripai's Nagesh Kamble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.