जर्मनीच्या एम़एफ़टी कंपनीवर सोलापूरातील ’प्रिसीजन’ चा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 05:45 PM2018-03-25T17:45:47+5:302018-03-25T17:45:47+5:30

युरोपातील कंपनी संपादित करणारी प्रिसिजन ही सोलापूर जिल्ह्यातील एकमेव कंपनी आहे. सोलापूरच्या उद्योगविश्वातील अतिशय मोठी अशी ही घटना आहे.

The possession of 'Precision' in Solapur, on the MFT company of Germany | जर्मनीच्या एम़एफ़टी कंपनीवर सोलापूरातील ’प्रिसीजन’ चा ताबा

जर्मनीच्या एम़एफ़टी कंपनीवर सोलापूरातील ’प्रिसीजन’ चा ताबा

Next
ठळक मुद्देप्रिसिजनने जर्मन कंपनीचे ७६ टक्के समभाग खरेदी केले प्रिसिजन ही कॅमशाफ्ट निर्मिती करणारी अग्रेसर कंपनी

सोलापूर :  प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लिमिटेड या येथील  कंपनीने जर्मनीतील एम.एफ.टी. ही कंपनी संपादीत केली आहे. ही कंपनी आता प्रिसिजन समूहाचा भाग झाली आहे. युरोपातील कंपनी संपादित करणारी प्रिसिजन ही सोलापूर जिल्ह्यातील एकमेव कंपनी आहे. सोलापूरच्या उद्योगविश्वातील अतिशय मोठी अशी ही घटना आहे. प्रिसिजनने जर्मन कंपनीचे ७६ टक्के समभाग खरेदी केले आहेत. प्रिसिजन ही कॅमशाफ्ट निर्मिती करणारी अग्रेसर कंपनी आहे.

संपादनाची ठळक वैशिष्ट्ये 
 प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लिमिटेडने एम.एफ.टी. या जर्मनीस्थित कंपनीचे समभाग खरेदी करून मशीन्ड सिलेंड्रीकल आणि प्रिझमॅटिक पार्टस्च्या उत्पादनात पाऊल ठेवून एक नवा समतोल साधला आहे. प्रिसिजनने हे संपादन पीसीएल (इंटरनॅशनल) होल्डींग बी.व्ही. या स्वत:च्या १०० टक्के सबसिडरी कंपनीच्या माध्यमातून केले आहे. कूनवाल्ड, जर्मनी येथील एम.एफ.टी. ही कंपनी फोक्सवॅगन, आॅडी, आॅपेल, बीएमडब्ल्यू अशा नामांकित ग्राहकांसह आघाडीच्या वाहन उत्पादकांना मशीन्ड कंपोनन्टस्चा पुरवठा करीत आहे.

एम.एफ.टी.ने २०१७  मध्ये रुपये १६० कोटींची उलाढाल (२० दशलक्ष युरो) नोंदवली आहे. येणाºया काळात व्यवसायात लक्षणीय वाढ होण्याची क्षमता या कंपनीत आहे. प्रिसिजनच्या जागतिक पातळीवरील विक्री यंत्रणेचा आणि तांत्रिक अनुभवाचा फायदा एम.एफ.टी.ला होईल. तसेच जागतिक पातळीवरील मूलभूत वाहन उत्पादकांच्या पुरवठादारांसाठीच्या योजनांमध्ये एम.एफ.टी.ला स्थान मिळेल. प्रिसिजनच्या आर्थिक पाठबळाचा उपयोग करून मोठ्या आणि भांडवली गुंतवणूकीच्या विस्तार योजना राबविता येतील. उत्पादनातील माहिती आणि ज्ञान, आॅटोमेशन, कमी खर्चिक देशांमध्ये पुरवठा साखळी निर्माण करण्याची संधी याआधारे एम.एफ.टी.ची व्यवसायवृद्धी होईल.

वाहन उद्योग क्षेत्रात जागतिक पातळीवर नावाजलेल्या प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लिमिटेड या सोलापूरस्थित कंपनीने आपल्या दुसर्या संपादनाची घोषणा केली आहे. जर्मनीस्थित एम.एफ.टी. (मोटोरेन उंड फारझोइग टेक्निक ॠेुऌ) या कंपनीचे ७६ टक्के समभाग प्रिसिजनने खरेदी करून युरोपियन बाजारपेठेत उत्पादनाच्या दृष्टीने पाऊल घट्ट रोवले आहे. प्रिसिजनने हे संपादन पीसीएल इंटरनॅशनल होल्डींग बी.व्ही.ह्ण या स्वत:च्या १०० टक्के सबसिडरी कंपनीच्या माध्यमातून केले आहे. 

प्रिसिजन कंपनी ही कॅमशाफ्ट्स उत्पादनाच्या बाबतीत वन स्टॉप सोल्यूशन म्हणून ओळखली जाते. चिल्ड कास्ट आयर्न, डक्टाईल आयर्न, हायब्रीड व असेंबल्ड कॅमशाफ्ट्सची निर्मिती करत गुणवत्तेमध्ये प्रिसिजनने जागतिक पातळीवर बेंचमार्क निर्माण केला आहे. उत्कृष्ट व्यवस्थापन, तंत्रज्ञान आणि प्रक्रिया आदींच्या बळावर प्रिसिजनने आतापर्यंत 60 दशलक्षपेक्षाही अधिक दोषरहित कॅमशाफ्ट्सचा पुरवठा केला आहे. स्थापनेपासूनच प्रत्येक क्षेत्रात यशाचा चढता आलेख पाहणार्या प्रिसिजनच्या ग्राहकांच्या यादीत फोर्ड मोटर्स, जनरल मोटर्स, टोयोटा, मारूती सुझुकी, ह्यूंदाई, डेमलर, पोर्श्चे यांसारख्या जगभरातील नामांकित वाहन उत्पादक कंपन्यांचा समावेश आहे. 

या संपादनाची घोषणा करताना प्रिसिजनचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यतिन शहा म्हणाले की, जर्मनीतील एम.एफ.टी. या कंपनीचे संपादन करताना आम्हाला आनंद होत आहे. या मूल्यवर्धित संपादनामुळे नवीन उत्पादनांबाबत व्यवसायाच्या आणखी संधी मिळू शकतील आणि प्रिसिजनला ग्लोबल ब्रँड म्हणून स्थिरावण्यास मदत होईल. एम.एफ.टी.चे संपादन हे प्रिसिजनच्या सध्याच्या ग्राहकांसोबत व्यवसायवृद्धी करेलच शिवाय ग्राहकाधारही वाढण्यासाठी फायदेशीर ठरेल. मेम्को आणि एम.एफ.टी. या दोन कंपन्या खरेदी केल्याने प्रिसिजन आपल्या मुख्य व्यवसायावर लक्ष केंद्रीत करत असतानाच निर्धारित उद्दिष्टाकडे वेगाने वाटचाल करेल. शिवाय नियोजित व्यावसायिक प्रकल्पांची अंमलबजावणी आणि हाती असलेल्या व्यवसायवृद्धीच्या संधींचा उपयोग करण्यासाठीही प्रिसिजन प्रयत्नशील राहील.

एम.एफ.टी. जर्मनी या कंपनीकडून फोक्सवॅगन, आॅडी, ओपेल, वेस्टफॅलिआ, हॅट्झ, सुझुकी अशा नामांकित ग्राहकांना बॅलन्सर शाफ्ट, कॅमशाफ्ट, बेअरिंग कॅप्स, इंजिन ब्रॅकेट्स आणि अन्य प्रिझमॅटिक कंपोनन्ट्सचा पुरवठा केला जातो. जर्मनीमध्ये कूनवाल्ड या पोलंड आणि झेक या देशांच्या सीमेवरील गावात एम.एफ.टी. कंपनी कार्यरत आहे. एम.एफ.टी.च्या स्टेट आॅफ आर्ट उत्पादन सुविधांमधून स्पर्धात्मक उत्पादन खर्चामध्ये पुरवठा केला जातो. मशीनिंग तंत्रज्ञानाचे सखोल ज्ञान असलेल्या  गिडो ग्लिन्सकी यांच्या धडाडीच्या नेतृत्वाखाली ही कंपनी व्यवसायवृद्धीशी एकनिष्ठ आहे.

या खरेदी व्यवहाराची अधिक माहिती देताना एम.एफ.टी.चे व्यवस्थापकीय संचालक  गिडो ग्लिन्सकी म्हणाले की, पीसीएल इंटरनॅशनल होल्डींग बी.व्ही.ह्णने मोठी गुंतवणूक केल्याने एम.एफ.टी.ला जागतिक पातळीवर आपले पाऊल अधिक घट्ट रोवता येईल. जर्मन आणि युरोपियन वाहन उत्पादकांच्या संशोधन आणि विकास विभागांशी थेट संपर्क साधणे सोपे होईल. तसेच वाहन उद्योगात होणार्या क्रांतीकारी बदलांना आकार देणे आणि भविष्यातील आव्हानांना तोंड देणे शक्य होणार आहे. पारंपारिक पॉवरट्रेनचा विकास आणि पयार्यी ड्राईव्हटे्रन तंत्रज्ञानाचा भाग होणे सोपे जाणार आहे. या संपादनामुळे आम्हाला आणि आमच्या कर्मचार्यांना भविष्यातील यशासाठी नवी दृष्टी लाभली आहे. या संधीचा उपयोग करून घेत शाश्वत वृद्धीसाठी प्रिसिजन समूह म्हणून एकत्रित चालण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.  एम.एफ.टी.चे व्यवस्थापकीय संचालक ग्लिन्सकी यांच्याकडे २४ टक्के समभाग राहणार असून हा व्यवसाय त्यांच्यामार्फतच पुढे चालवला जाणार आहे. 


प्रिसिजनचे मुख्य वित्त अधिकारी आणि संचालक रविंद्र जोशी म्हणाले की, मेम्कोच्या संपादनामुळे व्यवसायवाढीच्या नियोजनाला मदत झालीच आहे. आता एम.एफ.टी.मुळे व्यवसायाची मूल्यवृद्धी होणार आहे. या टप्प्यात झालेल्या आॅर्गानिक आणि इनआॅर्गानिक वृद्धीचा प्रत्यक्ष परिणाम पुढच्या आर्थिक वर्षात दिसून येईल. याबरोबरीनेच आम्ही आमच्या गुंतवणूकदारांना सुचवू इच्छितो की, संपूर्ण आर्थिक वषार्चे अवलोकन करावे. आम्ही चीनमधील संयुक्त प्रकल्प चालू केल्या क्षणापासून आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत झालेल्या निव्वळ नफ्याच्या पातळीकडेही आपले लक्ष वेधू इच्छितो.

या संपादनाबाबत प्रिसिजनचे व्यवसाय विकासक करण शहा म्हणाले की, ह्णप्रिसिजन आपल्या मजबूत आर्थिक ताळेबंदाच्या आधारावर वाहन उत्पादनाच्या व्यापक अशा युरोपियन बाजारपेठेमध्ये पाऊल टाकत आहे. उत्पादनाची सर्वंकष माहिती आणि ज्ञान, आर्थिक सक्षमता आणि युरोपियन ग्राहकांशी निर्माण होणारे सान्निध्य या तीन गोष्टींच्या आधारावर युरोपातील आमचा व्यवसाय निश्चितपणे वाढणार आहे. आम्ही संपादित केलेल्या कंपन्यांच्या सध्याच्या ग्राहकांकडूनच आणखी व्यवसाय वाढविण्यावर आमचा भर असेल.
अलीकडेच प्रिसिजनने जनरल मोटर्सकडून जागतिक पातळीवरील ५८० कोटींचा आणि फोर्ड मोटर्सकडून ५५० कोटी रूपयांचा व्यवसाय प्राप्त केला आहे. हे दोन्ही कायमस्वरूपी प्रकल्प सध्या विकासाच्या पातळीवर असून २०१८-१९ या आर्थिक वर्षात नियमित उत्पादनाला सुरूवात होईल. या शिवाय फोर्ड, जनरल मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांच्याकडूनही एकत्रित फुल्ली मशीन्ड कॅमशाफ्ट्सचा २७५ कोटी रूपयांचा कायमस्वरूपी व्यवसाय प्राप्त झाला आहे. 

प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लिमिटेड
प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लिमिटेड ही प्रवासी वाहनांसाठीच्या इंजिन प्रणालीमधील कॅमशाफ्ट हा अतिशय अवघड आणि महत्वाचा घटक बनविणारी जागतिक पातळीवर नावाजलेली कंपनी आहे. प्रवासी वाहने, ट्रॅक्टर्स, हलकी व्यापारी वाहने आणि रेल्वे यांच्यासाठी लागणार्या 150 प्रकारच्या कॅमशाफ्ट्सचे उत्पादन प्रिसिजनमधून केले जाते. लहान तसेच मध्यम आकाराच्या प्रवासी वाहनांसाठी आवश्यक कॅमशाफ्ट्स बनविण्यात प्रिसिजनचा हातखंडा आहे. प्रिसिजनच्या ग्राहकांच्या यादीत जनरल मोटर्स, फोर्ड, ह्यूंदाई, महिंद्रा, एस्कॉर्ट्स, टाटा, मारूती सुझुकी यांसारख्या मान्यवर कंपन्यांचा समावेश आहे. प्रिसिजन आपल्या उत्पादनापैकी 78 टक्के उत्पादनाचा पुरवठा जगातील पाच खंडांमध्ये करते. जागतिक बाजारपेठेतील सुमारे 9 टक्के वाटा प्रिसिजनकडे आहे. 

महाराष्ट्र राज्यातील सोलापूर येथील डोमेस्टिक आणि निर्यातभिमुख प्रकल्पांमधून प्रिसिजनचे उत्पादन चालते. या दोन्ही प्रकल्पांमध्ये ह्णस्टेट आॅफ आर्टह्ण सुविधा आहे. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील चिंचोळी एमआयडीसीतील निर्यातभिमुख प्रकल्पात चार फौंड्री आणि तीन मशीन शॉप आहेत. अक्कलकोट रोड एमआयडीसीतील डोमेस्टिक प्रकल्पात एक मशीन शॉप कार्यरत आहे. चीनमध्येही प्रिसिजनचे दोन संयुक्त प्रकल्प आहेत. त्यापैकी ह्णनिंग्बो शेंगलाँग पीसीएल कॅमशाफ्ट्स कंपनी लिमिटेडह्ण हा कॅमशाफ्ट्सच्या मशीनिंगसाठी तर ह्णपीसीएल शेंगलाँग हुझाऊ स्पेशलाईज्ड कास्टिंग कंपनी लिमिटेडह्ण हा कॅमशाफ्ट्सचे कास्टिंग बनविण्यासाठी आहे. आता प्रिसिजनने एम.एफ.टी.चे संपादन ह्णपीसीएल इंटरनॅशनल होल्डींग बी.व्ही.ह या 100 टक्के सबसिडरी कंपनीच्या माध्यमातून केले आहे.

एम.एफ.टी.
एम.एफ.टी. ही जर्मन कंपनी वाहनांच्या गिअरबॉक्स आणि इंजिनसाठी लागणार्या कॉम्प्लेक्स शाफ्ट्स, फास्टनिंग आणि होल्डिंग पार्टस्चे उत्पादन करते. तसेच कास्ट ब्लँक्स, फोर्ज्ड ब्लँक्सपासून बॅलन्सर शाफ्ट आणि कॅमशाफ्टचे संपूर्ण उत्पादन तसेच असेंबल्ड कॅमशाफ्टचे ग्राइंडिंग, हार्डनिंग हा एम.एफ.टी. या कंपनीच्या उत्पादनाचा गाभा आहे. एम.एफ.टी. ही कंपनी 1948 साली स्थापन झाली तेव्हा या कंपनीचे नाव ह्णव्ही.ई.बी. मोटोरेनवर्क कूनवाल्डह्ण असे होते. छोट्या आकारातील डिझेल इंजिन बनविणे हा प्रमुख व्यवसाय होता. 1990 मध्ये ही कंपनी ह्णडिझेल मोटोरेनवर्क कूनवाल्डह्ण या नावाने रूपांतरीत झाली. 1992 साली एम.एफ.टी. हे नाव मिळाले. 2012 पासून श्री. ग्लिन्सकी हे एम.एफ.टी.चे व्यवस्थापकीय संचालक आहेत. फोक्सवॅगन, आॅडी, जनरल मोटर्स आणि डेम्लर अशा जगातील नामांकित वाहन उत्पादकांसाठी विश्वासार्ह पुरवठादार म्हणून एम.एफ.टी.ने नावलौकिक मिळविला आहे. 2015 साली या कंपनीने जनरल मोटर्सचा गुणवत्तापूर्ण पुरवठादार म्हणून पुरस्कारही मिळवला.

Web Title: The possession of 'Precision' in Solapur, on the MFT company of Germany

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.