नाट्य परिषद निवडणूक सोलापूर : नटराज पॅनलचा दणदणीत विजय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 12:51 PM2018-03-05T12:51:22+5:302018-03-05T12:51:22+5:30

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नियामक मंडळाच्या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील आठ शाखांनी गठित केलेल्या नटराज पॅनलचा दणदणीत विजय झाल्याचे आज रात्री उशिरा स्पष्ट झाले.

Natura Parishad election Solapur: The winning sound of the Natraj panel! | नाट्य परिषद निवडणूक सोलापूर : नटराज पॅनलचा दणदणीत विजय !

नाट्य परिषद निवडणूक सोलापूर : नटराज पॅनलचा दणदणीत विजय !

googlenewsNext
ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यातील आठ शाखांनी गठित केलेल्या नटराज पॅनलचा दणदणीत विजयमतमोजणी पूर्ण झाल्यानंतर नटराज पॅनलचे उमेदवार आणि समर्थकांना विजय लपविता आला नाहीयंदाच्या निवडणुकीत फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, मेल यासारख्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात झाला


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ५ : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नियामक मंडळाच्या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील आठ शाखांनी गठित केलेल्या नटराज पॅनलचा दणदणीत विजय झाल्याचे आज रात्री उशिरा स्पष्ट झाले असून, या पॅनलच्या सहाही उमेदवारांनी पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला आणि सोलापुरात मोठी आघाडी घेऊन विजय संपादन केल्याचे सूत्रांनी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले. निवडणुकीचा  निकाल बुधवार, दि. ७ मार्च रोजी अधिकृतपणे जाहीर होणार आहे.
नटराज पॅनलमधून उपनगरीय शाखेकडून निवडणूक लढवित असलेले जयप्रकाश कुलकर्णी यांना १४२० मते मिळाली आहेत; तर सोलापूर शाखेचे आनंद खरबस यांना १३७४ मते मिळाली. सांगोला शाखेचे चेतनसिंह केदार यांनी १३८५ मते घेऊन विजय संपादन केला. पंढरपुरातून दिलीप  कोरके यांनी १४०१ इतक्या मतांसह विजयश्री खेचली. बार्शी शाखेचे सोमेश्वर घाणेगांवकर यांनी १२६९ मते घेत यश मिळविले; तर मंगळवेढ्याचे यतीराज वाकळे यांनी १२५८ मतांसह विजय खेचून आणला. स्वतंत्रपणे निवडणूक लढवित असलेले उपनगरीय शाखेचे बंडखोर  गुरू वठारे (३१६ मते), नागनाथ पाटील(३३३मते)  आणि सांगोला शाखेचे बंडखोर गणेश यादव (२६३ मते) यांना पराभवाला सामोरे जावे लागल्याचे सूत्रांनी सांगितले.
मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर नटराज पॅनलचे उमेदवार आणि समर्थकांना विजय लपविता आला नाही. त्यांनी मोदीखाना येथील ‘देवस्मृती’ या सोलापूर शाखेच्या कार्यालयासमोर जल्लोष साजरा केला. यावेळी उपनगरीय शाखेचे अध्यक्ष विजय साळुंखे, प्रा. ज्योतीबा  काटे, सर्व उमेदवार, अमोल धाबळे, सुहास मार्डीकर, अमीर तडवळकर, अमोल देशमुख, राजा बागवान, बार्शीचे अतुल दीक्षित, होनराव, अ‍ॅड. ढगे आदी उपस्थित होते.
या निवडणुकीसाठी सकाळी साडेनऊ वाजता ‘देवस्मृती’मध्ये मतदानास प्रारंभ झाला. सोलापुरात सोलापूर शाखा, उपनगरीय शाखा, महानगर शाखा आणि बार्शी शाखेच्या सभासदांसाठी मतदान झाले. सांगोल्यातील ज्योतिर्लिंग कॉन्फरन्स हॉलमध्ये; तर पंढरपुरात आयएमए हॉल आणि मंगळवेढ्यात इंग्लिश स्कूलमध्ये मतदान झाले. मतदानानंतर सायंकाळी साडेसात वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. पंढरपूर, मंगळवेढा आणि सांगोला येथील मतमोजणी लवकर संपली. तेथील बुथवर नटराज पॅनलचे सर्व उमेदवार सुमारे सातशे मतांनी आघाडीवर होते. रात्री साडेअकरा वाजता सोलापूरच्या दोन्ही बुथवरील मतमोजणी पूर्ण झाली. उपनगरीय शाखा आणि महानगर शाखा यासाठी एक आणि बार्शी व मुख्य शाखेसाठी एक असे दोन बुथ तयार केले होते. दोन्ही बुथवर १०४७ मतदारांपैकी ४८९ जणांनी मतदान करुन जवळपास ५० टक्के मतदानाचा आकडा पार केला होता. सायंकाळी ५.३० मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर येथे एकूण ६१७ जणांनी मतदान केल्याचे निवडणूक निर्णय अधिकाºयांनी स्पष्ट केले. मंगळवेढा केंद्रावर २५८ पैकी २२३ जणांनी, सांगोला येथे २५३ पैकी २४५ तर पंढरपूर येथे ७३८ पैकी ५४२ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण २२९६ मतदारांपैकी १६२५ जणांनी मतदान केल्याने ७० टक्के मतदान झाले. दुपारपर्यंत चारही मतदान केंद्रांवरील कल पाहता ६० ते ६५ टक्के मतदान होईल, असा व्होरा रंगकर्मींमधून होत होता. सायंकाळी जेव्हा अधिकृत आकडेवारी प्राप्त झाली तेव्हा सभासदांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे टक्केवारी वाढल्याचे दिसून आले. 
नियामक मंडळाच्या निवडणुकीसाठी पूर्वी टपालाने मतपत्रिका पाठवून मतदान व्हायचे; मात्र यावर्षी प्रथमच गुप्त मतदान पध्दत अवलंबण्यात आली. शिवाय सदस्यसंख्याही एकवरून सहा इतकी करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील यंदाची नाट्य परिषदेची ही निवडणूक राजकीय निवडणुकीप्रमाणे गाजली. सांस्कृतिक क्षेत्रातील या निवडी बिनविरोध होण्यासाठीचे प्रयत्न विफल झाल्यानंतर राजकारण सुरू झाले. नाट्य परिषदेची उपनगरीय शाखा, मंगळवेढा शाखेत बंडखोरी झाली. उपनगरीय शाखेचा उमेदवार निवडण्यासाठीही मतदान घ्यावे लागले. यामध्ये जयप्रकाश कुलकर्णी विजयी झाले होते. त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यात आली. नेपथ्यकार गुरू वठारे आणि नागनाथ पाटील यांची या शाखेत बंडखोरी झाली. मंगळवेढ्यात गणेश यादव यांनी बंडखोरी केल्यानंतर जिल्ह्यातील सोलापूरच्या मुख्य, महानगर आणि उपनगरीय अशा तीन शाखा, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला आणि बार्शी शाखेच्या पदाधिकाºयांनी एकत्र येऊन नटराज पॅनल गठीत केले होते.
-------------------------------
नटराज पॅनल -
कुलकर्णी जयप्रकाश श्रीकृष्णमूर्ती -     १४२० मते (उपनगरीय शाखा)
केदार चेतनसिंह तात्यासाहेब -     १३८५ मते (सांगोला शाखा)
कोरके दिलीप पांडुरंग -         १४०१ मते (पंढरपूर शाखा)
खरबस आनंद पाडुरंग -         १३७४ मते (सोलापूर शाखा)
घाणेगांवकर सोमेश्वर मन्मथ -    १२६९ (बार्शी)
वाकळे यतिराज बलभीम -     १२५८ (मंगळवेढा शाखा)
--------------
बंडखोर उमेदवार -
वठारे गुरूनाथ नामदेव -        ३१६ मते (उपनगरीय शाखा)
नागनाथ सिध्दा पाटील -         ३३३ मते (उपनगरीय शाखा)
गणेश यादव -        २६३ मते (मंगळवेढा शाखा)
सोशल मीडियाचा प्रभावी वापर
- यंदाच्या निवडणुकीत फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, मेल यासारख्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात झाला. याशिवाय गाठीभेटी, मेळाव्याच्या माध्यमातून आपल्या भूमिका मांडण्यात आल्या. व्यक्तिगत उमेदवारांनी प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यावर येणाºया मर्यादा लक्षात घेऊन सोशल मीडियाचा वापर केल्याचे दिसून आले. 

Web Title: Natura Parishad election Solapur: The winning sound of the Natraj panel!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.