राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते कल्याण पडाल यांची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2018 12:38 PM2018-05-20T12:38:15+5:302018-05-20T12:38:15+5:30

राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा म्होरक्या या चित्रपटाचे निर्माते कल्याण पडाल यांनी 38 व्या वर्षी आत्महत्या केली.

National award winner film maker Kalyan Padhal suicides | राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते कल्याण पडाल यांची आत्महत्या

राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते कल्याण पडाल यांची आत्महत्या

Next

सोलापूर : राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा म्होरक्या या चित्रपटाचे निर्माते कल्याण पडाल यांनी 38 व्या वर्षी आत्महत्या केली. आतड्याच्या कर्करोगाला कंटाळून त्यांनी गळफास घेऊन राहत्या घरी आपलं आयुष्य संपवलं. दोन दिवसांपूर्वी त्यांनी सोलापूरातील राहत्या घरी आत्महत्या केली होती पण घरच्यांनी ही बातमी गुपित ठेवण्याचा प्रयत्न केला पण शेवटी आज ही दुख:द बातमी समोर आली आहे. 

आतड्याच्या कर्करोगाने त्रस्त असलेल्या  कल्याण पडाल यांना काविळचाही त्रास होता. शिवाय कर्करोग हा लास्ट स्टेजला होता. कल्याण पडाल यांचं वय केवळ 38 वर्षे एवढं होतं. मात्र कर्करोगाने त्यांना ग्रासलं आणि आजाराला वैतागून त्यांनी आयुष्य संपवलं.  कल्याण पडाल यांच्या म्होरक्या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने या सिनेमाची मोठी उत्सुकता होती. हा सिनेमा सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. मात्र आता कल्याण पडाल यांच्या आत्महत्येमुळे हा सिनेमा वेळेत रिलीज होईल, की पुढे ढकलला जाईल, याकडे लक्ष लागलं आहे.

Web Title: National award winner film maker Kalyan Padhal suicides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.