मोठा अनर्थ टळला ! सोलापुरात सिद्धरामेश्वराच्या यात्रेत नंदीध्वज ट्रान्सफॉर्मर कोसळला 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2018 01:05 PM2018-01-15T13:05:20+5:302018-01-15T13:06:02+5:30

सोलापुरातील प्रसिद्ध श्री सिद्धरामेश्वरांच्या महायात्रेदरम्यान मोठी दुर्घटना टळली आहे. नंदीध्वज ट्रान्सफॉर्मरवर कोसळून आग लागली, मात्र भाविकांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.

nandidhwaj falls on transformer in siddharameshwar yatra in solapur | मोठा अनर्थ टळला ! सोलापुरात सिद्धरामेश्वराच्या यात्रेत नंदीध्वज ट्रान्सफॉर्मर कोसळला 

मोठा अनर्थ टळला ! सोलापुरात सिद्धरामेश्वराच्या यात्रेत नंदीध्वज ट्रान्सफॉर्मर कोसळला 

googlenewsNext

सोलापूर -  सोलापुरातील प्रसिद्ध श्री सिद्धरामेश्वरांच्या महायात्रेदरम्यान मोठी दुर्घटना टळली आहे. नंदीध्वज ट्रान्सफॉर्मरवर कोसळून आग लागली, मात्र भाविकांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. सोमवारी (15 जानेवारी) पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. 

सध्या सोलापुरात सिद्धरामेश्वरांची यात्रा सुरु आहे. सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महायात्रेमध्ये होमहवनासाठी नंदीध्वज निघाले होते,  हे नंदीध्वज माणिक चौकात आजोबा गणपतीनजीक आले असताना पहिला नंदीध्वज चुकून महावितरणच्या ट्रान्स्फॉर्मरवर पडला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

हा प्रकार घडला तेव्हा हजारो भाविक यात्रेत सहभागी होते, त्यामुळे मोठा अनर्थ ओढवू शकला असता. मात्र मानकऱ्यांनी नंदीध्वज वेळीच सावरल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. तासाभरात नंदीध्वजाला दुसरी खेळणी लावून पुन्हा मिरवणूक रवाना झाली. मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास हा सोहळा संपला.

Web Title: nandidhwaj falls on transformer in siddharameshwar yatra in solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.