आॅनलाइन लोकमत सोलापूर
माळशिरस दि ११ : प्रेमासाठी आईने पोटच्या चिमुकल्यांचा खून केल्याचा प्रकार गोरडवाडी (ता़ माळशिरस) येथे घडल्याचे उघडकीस आले़ याबाबत त्या निर्दयी आईविरोधात माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़
पोटच्या चिमुकल्यांचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांना पुरले़ मात्र ते दोन चमुकले कसे दगावले याचे गुढ कायम होते, मात्र याची माहिती खबºयामार्फत पोलिसांना मिळाली़ या दोन बालकांचे मृतदेह उकरून काढून तपासणीसाठी सोलापूरला पाठविण्यात आले़ त्यानंतर या प्रकरणाच्या तपासात धक्कादायक प्रकार उघडकीस आला़ ही दोन चिमुकले प्रेमात अडसर ठरत असल्या कारणाने आईनेच चक्क मुलांचा खून केला़
गोरडवाडी येथील संजय शंकर मिसाळ (वय २५) यांचे लग्न गावातील आप्पा सोपान आवळे यांची मुलगी सोनाली हिच्याशी  ४ वषापूर्वी  झाले होते़ त्यांना आदर्श ऊर्फ संभव (वय  २ वर्ष ) व  प्रशांत (वय ४  महिने) अशी मुले झाली़ दरम्यान सोनालीचे गावातील हरी तानाजी शिरतोडे याच्याशी अनैतिक संबंध जुळले़ सोनालीला त्याच्याशी लग्न करायचे होते, यासाठी ही मुले अडसर ठरत होती़ त्यासाठी या मुलांचा कायमच काटा काढला तर आपल्या प्रेमात अडसर होणार नाहीत, असा विचार करुन सोनालीने आपल्या दोन्ही मुलांचा चक्क खून केला, मात्र हा अपघात समजून ग्रामस्थांनी मुलांचे दफण केले. मात्र हा घातपात असल्याची खबर पोलिसांना मिळाली़ त्यानंतर हा प्रकार समोर आला़ याबाबत संजय शंकर मिसाळ  याने  सोनाली संजय मिसाळ, आप्पा सोपाण आवळे, काका आप्पा आवळे, हरी तानाजी शिरतोडे (सर्व रा़ गोरडवाडी) यांच्या विरुद्ध फिर्याद दिली असून कलम ३०२, ५०६, २०१, ३४ या कलमान्वये माळशिरस पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे़ अधिक तपास पोनि अश्विनी शेंडगे करीत आहेत़ 

-------------------------------
आता कोणाला खाऊ देऊ
गोरडवाडी येथे मिसाळ कुटुंब मोलमजुरी करुन  राहत होते. ही घटना घडली़ त्या दिवशी या चिमुकल्यांचा बाप कामावरून घरी येताना खाऊ घेऊन आला़ ते मुलांना खाऊसाठी उठवू लागले़ मात्र दोन्ही मुले मृत असल्याचे लक्षात आले. आता हा खाऊ मी कोणाला देऊ म्हणून त्यांनी टाहो फोडला़  वासनेसाठी प्रियकराबरोबर पळून जाण्यास अडसर ठरणाºया पोटच्या गोळ्याला संपवून, संसाराची होळी करू शकते हा प्रकार आईपणाला काळीमा फासणारे आहे, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या असून या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केले जात आहे़


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.