आधुनिक नवदुर्गा ; संकटावर स्वार झालेल्या कोंडाबाईने केले सहा जणांना डॉक्टर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 10:47 AM2018-10-12T10:47:32+5:302018-10-12T10:47:59+5:30

Modern Navadurga; Kondabai has six doctors, doctors, who are on the crisis! | आधुनिक नवदुर्गा ; संकटावर स्वार झालेल्या कोंडाबाईने केले सहा जणांना डॉक्टर!

आधुनिक नवदुर्गा ; संकटावर स्वार झालेल्या कोंडाबाईने केले सहा जणांना डॉक्टर!

Next

महेश कोटीवाले
वडवळ : ‘बाबांनो कष्ट हाच आपला देव आहे, काम करायला कधी लाजू नका, आपल्या हिमतीवर शिक्षण घ्या, मनगटात एवढी ताकद निर्माण करा की, यश तुमच्या पदरात येऊन पडेल’ ही वाक्ये कुण्या प्रथितयश व्यक्तीचे वा पुस्तकातील वाटतील पण असे नाही. स्वत: निरक्षर असून, पतीच्या निधनानंतर, प्रतिकूल परिस्थितीत आपल्या कुटुंबातील नऊ मुलांचा सांभाळ यशस्वीपणे तर केलाच पण सहा नातवंडे आज उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर झाली आहेत. या सगळ्यांचीच प्रेरणास्थान राहिलेल्या जिद्दी कोंडाबाई (अक्का) नागनाथ बाबर या नवदुर्गेची कहाणी अंगावर शहारे आणणारीच आहे.

२५ डिसेंबर १९९२ रोजी वडवळ (ता. मोहोळ) येथे राहणाºया कोंडाबाई यांचे पती नागनाथ यांचे आकस्मिक निधन झाले. कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. पदरात ६ मुले व ३ मुली... मात्र या संकटांना कोंडाबाई घाबरल्या नाहीत. उलट धाडसी पतीप्रमाणेच आपल्या कमरेला पदर खोचून त्या ताठ मानेने उभ्या राहिल्या. त्यांना मोहन, दिलीप, विष्णुपंत, पोपट, राजाराम व दयानंद ही ६ मुले तर सिंधू, सुनीता व मीनाक्षी या ३ मुली. या सर्वांना आपल्या वडिलांची उणीव न जाणवू देता, ही माऊलीच त्यांचे सर्वस्व झाली.

सर्व मुलांनी देखील आईची शिकवण अंगीकृत करून जिद्दीने प्रारंभ केला. आज मोहन हे भारतीय सैन्यात अधिकारी तर त्यांची मुले डॉ. शक्तीजित, डॉ. शांती, डॉ. सत्यजित हे वैद्यकीय क्षेत्रात आहेत. दिलीप यांची मुलगी डॉ. मोहिनी पुणे येथे स्त्री रोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत, तर विष्णुपंत यांची मुलगी डॉ. अंजली ही शिकत आहे. मुलगी सुनीता हिची मुलगी डॉ. कांचन सातपुते ही देखील वैद्यकीय शिक्षण घेत आहे 

बाबर कुटुंबातील या जडणघडणीमध्ये जयश्री, विजया, संगीता, कविता, सुप्रिया, कल्पना या सहा सुना व सिंधू, सुनीता, मीनाक्षी या तीन मुली जणू नवरात्रीची नऊ रूपे झाली आहेत. कोंडाबाई यांची आज देखील हीच शिकवण आहे. कष्ट करणाºयाच्या मागे सदैव देव असतो, त्यामुळे कोणत्याही कामाला लाजू नका, शिक्षण घेतले की ते नक्की यशस्वी करतेच.

कष्ट करा... लाजू नका!
च्कष्ट हेचं आपलं दैवत मानून कोंडाबाईनं निरक्षर असूनही पुढच्या पिढीमध्ये शिक्षणाचा वसा वाढवला. आयुष्यभर संघर्ष करत जागलेल्या सावित्रीबार्इंचा आदर्श मानत त्यांनी जीवनाशी दोन हात केले. कोणतेही काम करताना त्यांनी कमी न मानता कष्टाला न लाजता केल्याने होत आहे रे आधि केलेचि पाहिजे हा स्तुतीपाठ आपल्या मुलांपुढे ठेवला. उच्च विद्याविभूषित मुलांनीही माऊलीच्या या कष्टाचे चिज केलं. वडिलांच्या अकाली निधनानंतरही आईने वाढवलं  याचा सर्वांनीच ठेवलीय. मुलं शिकली मोठी झाली. नातवंडानीही नाव काढलं. आयुष्यात केलेल्या या संघर्षाचं काही वाटत नाही. मन तृप्त झाल्याची भावना कोंडाबाई व्यक्त करतात.

Web Title: Modern Navadurga; Kondabai has six doctors, doctors, who are on the crisis!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.