कोंडी येथील महाश्रमदानाने सोलापूर जिल्ह्यातील वॉटर कप स्पर्धेस उद्यापासून होणार प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 12:03 PM2018-04-07T12:03:10+5:302018-04-07T12:03:10+5:30

The Maha Shaman in Kondi will start the water cup of Solapur district from tomorrow | कोंडी येथील महाश्रमदानाने सोलापूर जिल्ह्यातील वॉटर कप स्पर्धेस उद्यापासून होणार प्रारंभ

कोंडी येथील महाश्रमदानाने सोलापूर जिल्ह्यातील वॉटर कप स्पर्धेस उद्यापासून होणार प्रारंभ

Next
ठळक मुद्देदुष्काळी गावासाठी एक खूप मोठया प्रमाणात आशेचा किरणमहाराष्ट्रातील ४०३४ गावा मधून ही स्पर्धा होत आहे़

सोलापूर : रविवार ८ एप्रिल रोजी पाणी फौंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप -३ स्पर्धेस प्रारंभ होत आहे़ उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी येथे उद्या रविवार ८ एप्रिल रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भक्ती जाधव यांनी दिली़ 

ही स्पर्धा म्हणजे दुष्काळी गावासाठी एक खूप मोठया प्रमाणात आशेचा किरण असणारी आहे. आतापर्यंत स्पर्धेत भाग घेऊन कितीतरी गावे पाणीदार झाली आहेत़ यावर्षी महाराष्ट्रातील ४०३४ गावा मधून ही स्पर्धा होत आहे़ उत्तर सोलापूर तालुक्यातील ३४ गावांचा यात समावेश आहे़ या धर्तीवर कोंडी येथे स्पर्धेच्या सुरवातीलाच महाश्रमदानचे आयोजन करण्यात आलेले आहे़ यासाठी सहभागी होणाºया नागरिकांसाठी १० एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे़ या बसेस जुना पुना नाका संभाजीराजे चौक येथुन सकाळी ७ वाजता निघणार आहेत़

या संघटना, संस्था होणार सहभागी
भारत सेवा संस्था, नेचर सर्कल, जयहिंद फूड बँक, जिजाऊ ब्रिगेड सोलापूर शहर, जिजाऊ ब्रिगेड सोलापूर, जिजाऊ ब्रिगेड अक्कलकोट शहर आणि तालुका, मराठा सेवा संघ, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, जगदंब जिजाऊ प्रतिष्ठान(मुले आणि मुली दोन्ही ग्रुप), इको फे्रंडली ग्रुप, इको नेचर ग्रुप, मराठा रणरागिणी ग्रुप, मूक बधिर विद्यालय,बार्शी, भारतरत्न इंदिरा गांधी इंजिनिअरिंग कॉलेज चे विद्यार्थी, श्री सिद्धेश्वर हायस्कुल, इंटरनॅशनल हयुमन राईटस संघटना, पर्यावरण प्रेमी ग्रुप, पर्यावरण सखी ग्रुप, संगमेश्वर कॉलेज मधील विद्यार्थी, नान्नज-कारंबा-मंडप येथील रहिवासी, पत्रकार मित्रमंडळी, पत्रकार, आकाशवाणी रेडिओचे मित्रमंडळी, पोलिस अधिकारी, शिक्षक, डॉक्टर, हिंदवी परिवार, हेल्प लाईन ग्रुप यासह आदी ग्रुप, संघटना, संस्था सहभागी होणार आहेत़ 

Web Title: The Maha Shaman in Kondi will start the water cup of Solapur district from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.