सोलापूर जिल्ह्यात पन्नास हजार तरुणांनी फिरविली मतदार नोंदणीकडे पाठ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 02:26 PM2019-03-04T14:26:33+5:302019-03-04T14:27:23+5:30

सोलापूर/ पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये युवकांना सहभागी करुन घेण्यासाठी मोहीम राबवूनही पुणे विभागातील अवघ्या ३० टक्के युवकांची नावे ...

Less than fifty thousand youths in Solapur district will be recruited to the voter registration | सोलापूर जिल्ह्यात पन्नास हजार तरुणांनी फिरविली मतदार नोंदणीकडे पाठ 

सोलापूर जिल्ह्यात पन्नास हजार तरुणांनी फिरविली मतदार नोंदणीकडे पाठ 

Next

सोलापूर/ पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये युवकांना सहभागी करुन घेण्यासाठी मोहीम राबवूनही पुणे विभागातील अवघ्या ३० टक्के युवकांची नावे मतदार यादीत समाविष्ट झाली आहेत. त्यातही पुणे जिल्हा त्यात पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे.

सांगलीमध्ये तुलनेने युवा मतदारांची नोदणी झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात १ लाख ८ हजार मतदार नोंदणी अपेक्षित होती. यापैकी ४६ हजार ३५७ जणांनीच नोंदणी केली आहे. यामुळे जवळपास ५० हजार नव्या मतदारांनी याकडे पाठ फिरविली आहे. 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या सर्व मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. त्यासाठी नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. इतकेच काय तर मतदार नोंदणीसाठी वयाचा आणि रहिवासी पुरावाच आवश्यक केला आहे. 
छायाचित्र असलेले ओळखपत्र नसले तरी चालणार आहे. विशेष मतदारनोंदणी मोहीम घेऊन नागरिकांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी दिली जात आहे. तर, १ जानेवारी २०१९ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाºया मतदारांसाठी शालेय वर्षाच्या सुरुवातीस महाविद्यालयात मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात आली होती. 

निवडणूकआयोगाकडून करण्यात येणाºया प्रयत्नानंतरही पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पुणे विभागातील १८ ते १९ वयोगटातील नवमतदारांनी फारसा उत्साह दाखविलेला नाही. लोकसंख्यावाढीच्या निकषाच्या आधारे पुणे विभागामध्ये १८ ते १९ वयोगटातील ८ लाख २२ हजार ६३३ युवक आणि युवती असतील. त्या पैकी अवघ्या २ लाख ५३ हजार १९६ जणांची नावे मतदार यादीत समाविष्ट झाली आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये साडेतीन लाख युवा मतदार असल्याचा अंदाज आहे. मात्र, त्या पैकी अवघ्या ५४ हजार ११५ युवा मतदारांची नावे यादीत समाविष्ट झाली आहेत. 

शिक्षणासाठी विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर पुणे, मुंबईसारखी महानगरे अथवा शहरांकडे धाव घेतात. त्यामुळे या वयोगटातील युवकांचे मतदार नोंदणीचे प्रमाण तुलनेने कमी दिसत असल्याचे विभागीय आयुक्तालय प्रशासनाचे म्हणणे आहे. स्थलांतरीत झालेल्या विद्यार्थ्यांनी आॅनलाइन नोंदणी करावी अथवा विशेष मतदार मोहिमेत अर्ज करावा.  त्यांचा अर्ज मूळ मतदारसंघात पाठविण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

जिल्हानिहाय १८-१९ वयोगटातील मतदारांची स्थिती
जिल्हा    १८-१९ वयोगटातील     प्रत्यक्ष नोंदणी 
                  अपेक्षित मतदार     झालेले मतदार
पुणे                   ३,५४,४२९        ५४,११५
सातारा              १,१९,१२६        ४१,५५६
सांगली              ८५,१८१        ५४,८६३
सोलापूर           १,०८,७४७        ४६,३५७
कोल्हापूर           १,५५,१५०        ५६,३०५    

Web Title: Less than fifty thousand youths in Solapur district will be recruited to the voter registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.