सोलापूरमध्ये व्हॉल्व्ह अन् पाण्याच्या पाईपलाईनवर गळती, पिण्याचे पाणी जातंय शेतात अन् ड्रेनेजमध्ये

By Appasaheb.patil | Published: March 31, 2023 04:39 PM2023-03-31T16:39:46+5:302023-03-31T16:40:58+5:30

तुळजापूर रोड ते शेळगी हायवे सर्व्हिस रोड जवळील रघोजी ट्रान्सपोर्ट जवळ पिण्याच्या पाण्याचे लाईनमोठ्या प्रमाणावर गळती दिसून आहे.

Leakage at valves and water pipelines, drinking water goes to fields and drainage in solapur | सोलापूरमध्ये व्हॉल्व्ह अन् पाण्याच्या पाईपलाईनवर गळती, पिण्याचे पाणी जातंय शेतात अन् ड्रेनेजमध्ये

सोलापूरमध्ये व्हॉल्व्ह अन् पाण्याच्या पाईपलाईनवर गळती, पिण्याचे पाणी जातंय शेतात अन् ड्रेनेजमध्ये

googlenewsNext

सोलापूर - शहरातील बहुतांश भागात व्हॉल्व्ह अन् पाण्याच्या पाईपलाईनवर गळती सुरू असून पिण्याची पाणी थेट शेतात अन् ड्रेनेजमध्ये जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तुळजापूर रोड ते शेळगी हायवेवर मोठया प्रमाणात पिण्याच्या पाणी गळतीमुळे वाहत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

तुळजापूर रोड ते शेळगी हायवे सर्व्हिस रोड जवळील रघोजी ट्रान्सपोर्ट जवळ पिण्याच्या पाण्याचे लाईनमोठ्या प्रमाणावर गळती दिसून आहे. तसेच पर्ल गार्डन येथे पाईपलाईन लिकेज होऊन मोठ्या प्रमाणात पाणीगळती सुरू आहे. अनेक दिवसांपासून व्हॉल्व्ह आणि पाण्याच्या पाईपलाईनवर लिकेज असल्याने मोठ्या प्रमाणात पिण्याचे पाणी ड्रेनेज व शेतातमध्ये जात आहे. सोलापूर शहरात काही ठिकाणी चार दिवसाआड तर हद्दवाढ भागात सहा दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे.

शहरातील झोन २ व झोन ३ मधील अधिकारी, जेई व एई प्रभागात फेरी मारून प्रभागातील विस्कळीत पाणीपुरवठा व पाण्याच्या गळतीचे वेळोवेळी दखल न घेतल्याने शहरावर पाणीपुरवठा विस्कळीत व नासाडी होत आहे. शहरातील विस्कळीत पाणीपुरवठाप्रश्नी आमदार, खासदार पालिकेत तक्रार करत असताना अधिकारी मात्र कामावर नीट लक्ष न दिल्याने तक्रारी वाढत आहे. जनतेला वेठीस धरण्याचे काम करणार्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे आणि प्रभागात पाणीचोरी व पाणीगळती वर त्वरित तोडगा काढून पाणीगळती बंद करून घ्यावे असे आवाहन माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी केले आहे.

Web Title: Leakage at valves and water pipelines, drinking water goes to fields and drainage in solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.