शिक्षकांना जुनी पेन्शनसाठी मिळावी यासाठी मिस कॉल मोहिम, राज्यात अभूतपुर्व प्रतिसाद, प्रतिदिन १० हजार कॉल येत असल्याची नवनाथ धांडोरे यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 09:04 AM2018-01-06T09:04:03+5:302018-01-06T09:05:27+5:30

या अभियानाला लाखाहुन जास्त कॉल' आले आहेत. रोज किमान दहा हजार 'मिस्ड कॉल' येत असून अभियानास सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत आहे. महाराष्ट्राबरोबरच  उत्तरप्रदेश ;पच्छिम बंगाल ;छत्तीसगड ;जन्मु काश्मीर ;मध्यप्रदेश या राज्यातुन मोठ्या प्रमाणात मिसकॉल येत आहे.

Information about Navdath Dhandore for getting monthly call campaign for teachers, old reports in the state, unprecedented response in the state, 10 thousand calls per day | शिक्षकांना जुनी पेन्शनसाठी मिळावी यासाठी मिस कॉल मोहिम, राज्यात अभूतपुर्व प्रतिसाद, प्रतिदिन १० हजार कॉल येत असल्याची नवनाथ धांडोरे यांची माहिती

शिक्षकांना जुनी पेन्शनसाठी मिळावी यासाठी मिस कॉल मोहिम, राज्यात अभूतपुर्व प्रतिसाद, प्रतिदिन १० हजार कॉल येत असल्याची नवनाथ धांडोरे यांची माहिती

Next
ठळक मुद्दे अवघ्या दहा दिवसात या अभियानाला लाखाहुन जास्त कॉल' महाराष्ट्राबरोबरच  उत्तरप्रदेश ;पच्छिम बंगाल ;छत्तीसगड ;जन्मु काश्मीर ;मध्यप्रदेश या राज्यातुन मोठ्या प्रमाणात मिसकॉलसप्टेंबर व आॅक्टोबरमध्ये चालविलेल्या स्वाक्षरी मोहीमेस दिड लाखांहुन अधिक स्वाक्षºया


आॅनलाइन लोकमत सोलापूर
वडवळ :  'जुनी पेन्शनसाठी आपली साथ हवी, फक्त एक 'मिस्ड कॉल' देऊन लढ्यास पाठिंबा दर्शवा', असे आवाहन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेतर्फे राज्यातील तसेच देशातील नागरीकांना करण्यात आले आहे. अवघ्या दहा दिवसात या अभियानाला लाखाहुन जास्त कॉल' आले आहेत. रोज किमान दहा हजार 'मिस्ड कॉल' येत असून अभियानास सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत आहे. महाराष्ट्राबरोबरच  उत्तरप्रदेश ;पच्छिम बंगाल ;छत्तीसगड ;जन्मु काश्मीर ;मध्यप्रदेश या राज्यातुन मोठ्या प्रमाणात मिसकॉल येत आहे. अशी माहिती संघटनेचे विश्वस्त व सोलापूर जिल्हा अध्यक्ष नवनाथ धांडोरे यांनी  दिली.
अनेक विभागातील राज्य व केंद्र शासनाचे पदाधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत नवी मुंबई येथे  नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर व राज्य सचिव गोविंद उगले यांच्या हस्ते या 'मिस्ड कॉल' अभियानाची सुरुवात करण्यात आली. 
मिस कॉल मोहीमेचे मुख्य प्रवर्तक सचिन खारतोडे यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य कर्मचाºयाच्या निवृत्ती वेतनाबाबत राज्य सरकारने ३१ आॅक्टोबर २००५ च्या शासन निर्णयानुसार १९८२-८४ च्या कायद्यानुसारची निवृत्तीवेतन योजना बंद करून शेअर बाजारावर आधारीत नवीन अंशदान निवृत्तीवेतन योजना किंवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना सुरु केली आहे. मात्र १२ वषार्नंतरही त्याला कायद्याचा आधार नाही, कपातीचा हिशोब नाही त्यामुळे सर्व कर्मचाºयांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संगठनने वारंवार निवेदने देऊन, नागपूर आक्रोश मोर्चा, जिल्हानिहाय मोर्चे, धरणे आंदोलने, उपोषणे करून १९८२ ची कायद्यानुसारची जुनी पेन्शन योजनाच लागू करावी, अशी मागणी केली आहे.
------------------
 मिस कॉल द्या़़़सहभाग नोंदवा़़
सरकारी व निमसरकारी कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना मिळावी, या मागणीला पाठींबा देण्यासाठी ८४४८४९३५४४ या क्रमांकावर समाजातील सर्व विचारशील नागरिकांनी, सरकारी व निमसरकारी कर्मचाºयांनी 'मिस्ड कॉल' द्यावा, असे जाहीर आवाहन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेतर्फे सोलापूर जिल्हा अध्यक्ष नवनाथ धांडोरे ; सरचिटणीस अरूण चौगुले सोशल मिडीया प्रमुख प्रकाश कोळी  यांनी राज्यातील तसेच देशातील नागरीकांना केले आहे.
---------------
सप्टेंबर व आॅक्टोबरमध्ये चालविलेल्या स्वाक्षरी मोहीमेस दिड लाखांहुन अधिक स्वाक्षºया झाल्या होत्या. १९८२ च्या जुनी पेन्शन योजना समर्थनार्थ जनजागृती आणि लोकसहभागासाठी महाराष्ट्रातून 'मिस्ड कॉल' अभियानास सुरुवात झाली असून ते देशभर राबवले जात आहे़
- नवनाथ धांडोरे
जिल्हाध्यक्ष, जुनी पेन्शन संघटना सोलापूर
 

Web Title: Information about Navdath Dhandore for getting monthly call campaign for teachers, old reports in the state, unprecedented response in the state, 10 thousand calls per day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.