निर्यात अनुदान वाढ केल्याने सोलापुरातील बाजारात कांदा दरामध्ये २०० रूपयांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 02:24 PM2019-01-01T14:24:12+5:302019-01-01T14:26:09+5:30

सोलापूर : कांदा निर्यात अनुदान १० टक्के केल्यानंतर सोमवारी दरात थोडीशी तेजी (सुधारणा) झाली असल्याचे सोलापूर बाजार समितीमध्ये दिसून ...

Increase in export subsidy: Onion prices increased marginally by 200 rupees in Solapur | निर्यात अनुदान वाढ केल्याने सोलापुरातील बाजारात कांदा दरामध्ये २०० रूपयांची वाढ

निर्यात अनुदान वाढ केल्याने सोलापुरातील बाजारात कांदा दरामध्ये २०० रूपयांची वाढ

Next
ठळक मुद्देगुणवत्तेचा कांदा विकला ८०० रुपये क्विंटलशेतकºयांना प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान दिले जाणारसोलापूर बाजार समितीमध्ये शनिवारी १०० व सोमवारी ३०० शेतकºयांनी कांदा अनुदान अर्ज दाखल केले

सोलापूर : कांदा निर्यात अनुदान १० टक्के केल्यानंतर सोमवारी दरात थोडीशी तेजी (सुधारणा) झाली असल्याचे सोलापूरबाजार समितीमध्ये दिसून आले. उत्तम गुणवत्तेच्या कांद्याला ८०० ते एक हजार रुपयांपर्यंतचा दर मिळाला. दरामध्ये सुमारे २०० रूपयांची तेजी आली आहे.

कांद्याचे दर कोसळल्याने केंद्र सरकारने कांदा निर्यात अनुदान ५ टक्क्यांपर्यंत वाढविले आहे. हा निर्णय केंद्राने शुक्रवार दिनांक २८ डिसेंबर रोजी घेतल्यानंतर सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात शनिवारी व सोमवारी काही प्रमाणात वाढ झाली. मागील आठवड्यात कांद्याचा दर क्विंटलला २५ रुपयांपासून एक हजार रुपयापर्यंत होता.  

कांदा निर्यात अनुदान जाहीर झाल्यानंतर शनिवारी व सोमवारी गुणवत्तेच्या कांद्याला क्विंटलला १३७५ रुपयांपर्यंत दर मिळाला. मागील आठवड्यात सरासरी ४०० ते ५०० रुपये दर मिळाला होता तो सोमवारी ५५० रुपयांपर्यंत गेला. सोमवारी सोलापूर बाजार समितीमध्ये ३०९ ट्रक कांद्याची आवक सोलापूर बाजार समितीमध्ये झाली होती. कांद्याची आवक स्थिर असताना दरात थोडीशी सुधारणा झाली असल्याचे सांगण्यात आले.

चांगल्या कांद्याला क्विंटलला सर्वसाधारण ५०० ते ६०० रुपयांचा दर मिळत असल्याचे शेतकºयांकडून सांगण्यात आले. एखाद्या अडत्याकडे चांगल्या कांद्याला  प्रतिक्विंटलला एक हजार ते १२०० रुपयांचा दर मिळाला असल्याचेही शेतकºयांकडून सांगण्यात आले.

अनुदान अर्जांसाठी शेतकºयांची गर्दी
राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे एक नोव्हेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान कांदा विक्री झालेल्या शेतकºयांना प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान दिले जाणार आहे. यासाठी शेतकºयांनी अर्ज भरुन द्यावयाचे आहेत. सोलापूर बाजार समितीमध्ये शनिवारी १०० व सोमवारी ३०० शेतकºयांनी कांदा अनुदान अर्ज दाखल केले आहेत. अर्ज व अर्जाची माहिती घेणे तो भरुन देण्यासाठी दिवसभर शेतकºयांनी बाजार समिती कार्यालयात गर्दी केली होती.

चांगला कांदा विक्रीसाठी आणला होता. ८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.  काढणी, बारदाणा व वाहतुकीसाठी ७ हजार ५०० खर्च आला. कांदा लागवडीपासून केलेला खर्च वजा जाता पदरात काहीच पडले नाही. आहे त्यात समाधान मानले.
- अमोल चंद्रकांत साठे, कांदा उत्पादक शेतकरी

गुणवत्तेच्या कांद्याला क्विंटलला एक ते दीड हजार रुपये दर मिळाला तरी किमान तोटा तरी होत नाही. शेतकरी जगावा असे शासन व व्यापाºयांना वाटले पाहिजे. ते होत नसल्यानेच शेतकरी सतत दारिद्र्यात जगत आहे. कांद्याला हमीभावच दिला पाहिजे.
- महामूद पटेल, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
 

Web Title: Increase in export subsidy: Onion prices increased marginally by 200 rupees in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.