Husband of the husband who was locked up in connection with unethical relations in Kolegaon | कोळेगाव येथे अनैतिक संबंधास आड येणा-या पतीचा खून

ठळक मुद्देयुवराज उर्फ बाबू देविदास कापुरे असे खून करण्यात आलेल्याचे नाव आहेमयत युवराजची पत्नी मोनालीबरोबर दीर आकाशचे सहा महिन्यांपासून प्रेमसंबंध होते

मोहोळ : अनैतिक संबंधास आड येणा-या पतीचा पत्नीने दीराच्या मदतीने दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना मंगळवारी रात्री तालुक्यातील कोळेगाव येथे घडली. युवराज उर्फ बाबू देविदास कापुरे असे खून करण्यात आलेल्याचे नाव आहे. मयत युवराजची पत्नी मोनालीबरोबर दीर आकाशचे सहा महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. दोन महिन्यांपूर्वी दोघे घरात एकत्र जेवण करीत असल्याचे युवराजने पाहिले. त्यामुळे त्याला दोघांविषयी शंका आली. त्यानंतर त्याने पत्नी मोनालीकडे सातत्याने विचारणा करीत होता. ६ मार्च रोजी रात्री ११.३० वाजता पत्नी मोनाली आणि दीर आकाशने युवराजचा दोरीने गळा आवळून खून केला.

घटनेनंतर मोनाली ही सासू-सासºयाकडे जाऊन पती झोपेतून उठत नसल्याचे सांगितले. त्यानंतर सासू आणि दीर हे दोघे तेथे पोहोचले. त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलविले. युवराजचा मृत्यू दोरीने गळा आवळून झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर मोनालीला ताब्यात घेतल्यावर तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. दीरासोबत आपण पतीचा खून केल्याची कबुलीही तिने दिली.

पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखालीसहायक पोलीस निरीक्षक विक्रांत बोधे, सहायक फौजदार ए. एस. आय. पटेल, विष्णू गायकवाड, हवालदार शीतलकुमार गायकवाड तपास करीत आहेत. 


Web Title: Husband of the husband who was locked up in connection with unethical relations in Kolegaon
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.